शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

राज्यात ऋतूंची मिसळ : अहमदनगरमधे थंडावा, सोलापूरात ऊन तर विदर्भ-मराठवाड्यात पावसाची शक्यता   

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 2:41 PM

राज्यात विविध ठिकाणी ऊन, पाऊस आणि थंडीचा खेळ अनुभवसाय मिळत आहे. काही ठिकाणच्या किमान तापमानाच्या पाऱ्यात घट झाली आहे. काही भागातील पारा पस्तीशी पार गेला आहे.

पुणे : राज्यात विविध ठिकाणी ऊन, पाऊस आणि थंडीचा खेळ अनुभवसाय मिळत आहे. काही ठिकाणच्या किमान तापमानाच्या पाऱ्यात घट झाली आहे. काही भागातील पारा पस्तीशी पार गेला आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पुढील तीन दिवस तुरळक पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.              उन्हाळा सुरु झाला असे वाटत असतानाच मध्ये काही दिवस पहाटे आणि रात्री चांगला गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा काही ठिकाणचा कमाल पारा पस्तीशी पार आणि काही भागात तर कमाल पाऱ्याने ३९च्या पुढे मजल मारली होती. मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट नोंदविण्यात आली. तसेच मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणचा किमान तापमानाचा पाऱ्यात कमालीची घट झाली. रविवारी (दि. १०) मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. तर, सोमवारी आणि मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची हजेरी राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.                मध्यमहाराष्ट्रात अहमदनगर, जळगाव, महाबळेश्वर, सांगली आणि सोलापूरच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली. अहमदनगरला राज्यात नीचांकी १२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोलापूरचा किमान तापमानाचा पारा १६.५ अंशावर, तर कमाल तापमानाचा पारा ३७.५ अंशावर होता. जळगावला किमान तापमान १३.६ आणि कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. महाबळेश्वरला किमान तापमान १५.५ अंश आणि कमाल तापमान ३१.६ अंश सेल्सिअस होते. पुण्यामध्ये किमान तापमान १४.८ आणि कमाल तापमान २६.२, तर लोहगावला किमान तापमान १७.१ आणि कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. मालेगावला राज्यातील सार्वधिक ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.                        मराठवाड्यातीत किमान तापमानाचा पारा १४ ते १६ अंश सेल्सिअस दरम्यान होता. औरंगाबाद येथे कमाल तापमान ३४.५, परभणी ३६.६, नांदेड ३४.५ आणि बीडला ३६.८ अंश सेल्सिअस होते. विदर्भातील किमान तापमानाचा पारा १.९ ते ४.३ अंश सेल्सिअसने घसरला. विदर्भात ब्रम्हपुरी येथे सर्वात जास्त ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. तर, किमान तापमानाचा पारा गोंदिया येथे १३.४ अंश सेल्सिअस इतका नीचांकी होता. बुलडाणा (३३.२) वगळता विदर्भात कमाल तापमानाचा पारा पस्तीशी पार गेला होता. 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमान