शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या ‘तज्ज्ञ’ नियंत्रणातून सहकारी संस्थांची लवकरच सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 06:05 IST

सरकारी नियुक्त्या होणार रद्द : दोन स्वीकृत सदस्य नेमण्याची प्रक्रिया सुरू करणार

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील अनेक सहकारी संस्थांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपले नियंत्रण आणण्याच्या तत्कालीन सरकारच्या रणनीतीचा एक भाग म्हणून करण्यात आलेल्या प्रत्येकी दोन तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्त्या लवकरच रद्द करण्यात येणार आहेत.

राज्यातील बहुतेक सहकारी संस्थांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्षानुवर्षे वर्चस्व राहिले आहे. शासकीय भागभांडवल वा अन्य कोणत्याही स्वरूपातील शासकीय मदतीतून उभ्या राहिलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांवर दोन तज्ज्ञ सदस्य नेमण्याची पद्धत देवेंद्र फडणवीस सरकारने २०१६ मध्ये आणली. त्यामुळे भाजप-संघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सहानुभूतीदार अशा अनेकांना सहकारी संस्थांमध्ये शिरकाव मिळाला होता.

राज्यात अनेक ठिकाणी संघ-भाजपच्या लोकांची वर्णी लावण्यात आली असून, अशांना घरी पाठवायला पाहिजे, असे आग्रही मत महाविकास आघाडी आमदारांच्या बैठकीत मंगळवारी व्यक्त करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी त्यास दुजोरा दिला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीचे बलस्थान म्हणून सहकारी संस्थांकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या तीन वर्षांत तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्यांच्या माध्यमातून भाजपने या संस्थांमध्ये हस्तक्षेप सुरू केला होता आणि हे करताना सहकारी संस्थांचा कारभार अधिक परिणामकारकपणे चालावा म्हणून तज्ज्ञ सदस्यांची गरज असल्याचा मुलामादेखील देण्यात आला होता. त्यामुळेच ३०२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी २५० हून अधिक समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुतगिरण्या, कृषी प्रक्रिया संस्था आदींमध्ये तज्ज्ञ संचालक नेमण्यात आले.आता महाविकास आघाडीचे सरकार या नियुक्त्या लवकरच रद्द करून, त्याऐवजी प्रत्येक सहकारी संस्थेत दोन स्वीकृत सदस्य नेमण्याची प्रक्रिया सुरू करेल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

विविध महामंडळांवर फडणवीस सरकारने केलेल्या नियुक्त्या महाविकास आघाडी सरकारने गेल्याच आठवड्यात रद्द केल्या आहेत. याशिवाय, संघ-भाजपशी संंबंधितांची विविध शासकीय संस्थांवर कुठे कुठे नियुक्ती करण्यात आली आहे, याची माहिती घेतली जात आहे.सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांवरही गंडांतरराज्यातील तीन उच्च न्यायालयांमधील सरकारी वकिलांच्या १७५ नियुक्त्याही रद्द होण्याची शक्यता आहे. संघ-भाजपशी निगडित वकिलांचा या नियुक्त्यांमध्ये भरणा होता. त्यांची नियुक्ती मुदतीपूर्वी रद्द केली तर, त्यांच्यापैकी काही जण राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. सध्या पदांवर असलेल्यांची मुदत मार्च ते आॅक्टोबर २०२० पर्यंत संपणार आहे.

राज्य सहकारी बँकेची निवडणूक घेणार!राज्य सहकारी बँकेवर आधी काँग्रेसचे आणि नंतर राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचा वरचष्मा असलेल्या या बँकेचे संचालक घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर बरखास्त करण्यात आले होते. सध्या सोलापूरच्या विद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर हे राज्य बँकेचे मुख्य प्रशासक आहेत, तर भाजपशी संबंधित असलेले अविनाश महागावकर आणि संजय भेंडे हे प्रशासक मंडळाचे सदस्य आहेत. हे मंडळ बरखास्त करून आपल्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या राज्य बँकेच्या संचालक मंडळाची लवकरात लवकर निवडणूक घेण्यासाठी विशेषत: राष्ट्रवादीचा आग्रह राहील.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी