शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष महोदय म्हणायलाच लागतं का?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 12:00 IST

नाना पटोलेंचं अभिनंदन करताना फडणवीसांना चिमटा

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नाना पटोलेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांना 'अध्यक्ष महोदय'वरुन जोरदार टोला लगावला. त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. नाना पटोले सर्वांना समान न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.भाजपाचे उमेदवार किसन कथोरेंनी त्यांचा अर्ज मागे घेतल्यानं विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड झाली. यानंतर हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पटोलेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पटोले विधानसभा अध्यक्षपदी स्थानापन्न झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केलं. 'नाना पटोले शेतकऱ्यांचे नेते आहेत. भाजपासोबत असतानाही त्यांनी त्यांचा आक्रमक बाणा कायम ठेवला. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून त्यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपामधून बाहेर पडले. त्यांचा स्वभाव अतिशय बंडखोर आहे. कोणाचीही भीडभाड न बाळगता ते त्यांची मतं व्यक्त करतात,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पटोलेंचं तोंडभरुन कौतुक केलं. नाना पटोलेंचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. पटोलेंकडे पाहत 'अध्यक्ष महोदय म्हणावंच लागतं का?', असा प्रश्न विचारत उद्धव यांनी फडणवीसांचा चिमटा काढला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 'आपली २५ वर्षांची मैत्री आहे. त्यामुळे ते नातं लक्षात घेऊन तुम्ही वेळोवेळी सुधारणा सुचवाल अशी अपेक्षा करतो,' असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पटोलेंचं अभिनंदन केलं. अध्यक्ष दोन्ही बाजूंना सांभाळून घेण्याचं काम करतात. तुम्हीही त्याच पद्धतीनं काम कराल आणि विरोधी पक्षाला न्याय द्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNana Patoleनाना पटोले