Chipi Airport : "सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे; नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधला"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 02:31 PM2021-10-09T14:31:33+5:302021-10-09T14:31:54+5:30

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फटकेबाजी.

cm uddhav thackeray speaks on chipi airport criticize minister narayan rane maharashtra | Chipi Airport : "सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे; नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधला"

Chipi Airport : "सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे; नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधला"

Next
ठळक मुद्देचिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फटकेबाजी

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिपी विमानतळाचं अखेर सर्वांसाठी खुला होत आहे. या विमानतळाच्या उद्धाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), पर्यावर मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), रामदास आठवले सुभाष देसाई  आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) हेदेखील उपस्थित होते. "सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे; नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधला," असं म्हणत विरोधकांना टोला लगावला.

"आजचा क्षण हा आदळ आपट नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. पर्यटनावर तळमळीने आणि मळमळीनं बोलणं वेगळं आहे. ज्योतिरादित्य शिंदे अधिक तळमळीनं बोलत होते. पाठांतर करून आणि आत्मसात करून बोलणं वेगळं आहे. शिवसेना आणि कोकणाचं नातं सांगायला नको," असं यावेळी मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  विनायक राऊत हे निवडून आलेले खासदार आहेत, असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी टोला लगावला. "बाळासाहेबांना खोटं बोलणारी आवडत नाहीत म्हणून त्यांनी पक्षातून काढून टाकलं. त्यांनी गेट आऊट केलं होतं हा इतिहास आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तुम्ही केंद्रात मंत्री आहात. लघु का असेना सुक्ष्म का असेना. महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

"ही जाहिर सभा नाही, दुर्दैवानी आणि नाईलाजानं बोलावं लागलं. कोकणची जनता डोळे मिटून राहत नाही. ते घाबरत नाहीत त्यामुळे इथले लोकप्रतिनिधी निवडले गेले. पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राणेंना टोला लगावला. संधीची माती करू नका, सोनं करा. विकास कामत राजकीय जोडे नको, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

Web Title: cm uddhav thackeray speaks on chipi airport criticize minister narayan rane maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app