Corona Vaccination: "केंद्र सरकारनं लसीकरण नोंदणीसाठी वेगळा ऍप लवकर द्यावा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 23:35 IST2021-05-12T22:40:57+5:302021-05-12T23:35:05+5:30
Corona Vaccination: सध्याच्या ऍपमध्ये त्रुटी असल्यानं महाराष्ट्राला लसीकरण नोंदणासाठी वेगळा ऍप देण्याची विनंती

Corona Vaccination: "केंद्र सरकारनं लसीकरण नोंदणीसाठी वेगळा ऍप लवकर द्यावा"
मुंबई- केंद्र सरकारच्या लसीकरण ऍपमध्ये त्रुटी असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला लसीकरण नोंदणीसाठी वेगळा ऍप द्यावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. सध्याच्या ऍपमुळे लसीकरणाची नोंदणी करताना लसीकरणाचा स्लॉट तासनतास प्रयत्न करून मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आज कोणत्याही केंद्रात जाऊन नागरिक लस घेत असल्याने असून स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकराने लसीकरण नोंदणीसाठी वेगळा ऍप लवकर द्यावा अशी आग्रही मागणी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी केंद्र सरकारला केली आहे.
एक कोटी लसींसाठी महापालिकेने मागवली जागतिक निविदा; १८ मेपर्यंतची मुदत
लोकमतशी बोलताना आमदार सुनील प्रभू म्हणाले की, सध्याच्या ऍपमध्ये कोणत्याही भागातून नागरिक नोंदणी करतात. त्यामुळे स्थानिकांना लसीकरणासाठी प्राधान्य मिळत नाही. आणि ते मग दोष महापालिका व राज्य शासनाला देतात. जर राज्य सरकारला लसीकरण नोंदणीसाठी वेगळा ऍप दिल्यास नागरिकांना त्यांच्या राहत्या विभागाप्रमाणे लसीकरण करणे सुलभ जाईल असा विश्वास आमदार प्रभू यांनी व्यक्त केला.