मुख्यमंत्र्यांचं नवं मिशन! आज १२ मोठ्या करारांवर करणार स्वाक्षऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:35 AM2020-06-15T05:35:33+5:302020-06-15T06:55:17+5:30

अर्थचक्राला गती : १२ मोठ्या सामंजस्य करारांवर होणार स्वाक्षऱ्या

cm uddhav thackeray to kick start magnetic maharashtra 2 0 today | मुख्यमंत्र्यांचं नवं मिशन! आज १२ मोठ्या करारांवर करणार स्वाक्षऱ्या

मुख्यमंत्र्यांचं नवं मिशन! आज १२ मोठ्या करारांवर करणार स्वाक्षऱ्या

Next

मुंबई : महाराष्ट्रातील अर्थचक्र गती देण्यासाठी १२ मोठ्या सामंजस्य करारांवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षºया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या करारांमुळे आपला मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात होईल. त्यात प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर, ४०,००० एकराहून अधिक क्षेत्रफळाची लँडबँक, लवचिक भाड्याने आणि किंमतीची रचना, महापरवाना च्या माध्यमातून ४८ तासात स्वयंचलित परवानग्या, विशेष कामगार संरक्षण मार्गदर्शन व स्थानिक कौशल्य यासाठी कामगार ब्युरो यासारखे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत.

यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई , उद्योग राज्य मंत्री अदिती तटकरे यांचीही उपस्थिती राहील. या सामंजस्य कराराद्वारे अमेरिका , चीन , दक्षिण कोरिया, सिंगापूर व भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास सहमती दिली असून ते अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया व इतर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन रोजगारदेखील उपलब्ध होईल, असा दावाही सूत्रांनी केला.

Web Title: cm uddhav thackeray to kick start magnetic maharashtra 2 0 today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.