cm uddhav thackeray criticized bjp leader narayan rane over medical college | तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण फक्त स्वतःचा विचार करतात; उद्धव ठाकरेंचा राणेंवर 'प्रहार'

तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण फक्त स्वतःचा विचार करतात; उद्धव ठाकरेंचा राणेंवर 'प्रहार'

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांची नारायण राणेंवर नाव न घेता टीकाकोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटनयोजना पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन करण्यासाठी कोकणात येईन - उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. कोकणासाठी तुम्ही मागणी केली, नाहीतर काही जण केवळ स्वतःसाठी मागत असतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला. (cm uddhav thackeray criticized bjp leader narayan rane over medical college)

कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, या योजना पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: उद्घाटन करण्यासाठी कोकणात येईन. अनेकदा योजनांची घोषणा केली जाते. भूमिपूजन केले जाते आणि पुढे काम होत नाही. मात्र, आपल्या सरकारकडून तसे होणार नाही. या योजनांचा शुभारंभ झालाय. त्या आपण पूर्ण करणार आहोत, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले.

मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना? चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारला विचारणा

नारायण राणेंवर 'प्रहार'

तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितले. तुम्ही स्वत:साठी काही मागू शकला असतात. मात्र, तसे केले नाहीत. काही जण असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही ना काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी मागितले. याचा मला अभिमान वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही स्वत:साठी काही मागितले नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

मला खोटे बोलता येत नाही

मेडिकल कॉलेजची घोषणा आजही मी करू शकतो. मात्र, मला खोटे बोलता येत नाही. कोकणात कॉलेज करायचे हे माझ्या लक्षात आहे. हे काम करू शकतो की नाही, याची खात्री होत नाही, तोपर्यंत मी तुम्हांला शब्द देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संसर्गपासून सावध राहण्याच्या पुन्हा एकदा सूचना केल्या. कोरोना होऊ नये म्हणून त्रिसूत्री पाळा. शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करा, असेही ते म्हणाले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: cm uddhav thackeray criticized bjp leader narayan rane over medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.