शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

शेवटी उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली भावाची इच्छा; भुजबळांच्या फडणवीसांना अनोख्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 15:15 IST

फडणवीसांचं अभिनंदन करताना भुजबळांची फटकेबाजी

मुंबई: विधानसभा निवडणुकीवेळी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी राज्याला मजबूत विरोधी पक्ष मिळावा असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावाचं ते स्वप्न पूर्ण केलं, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. राज ठाकरेंना मजबूत विरोधी पक्ष हवा होता. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावाची मागणी पूर्ण केली, असा चिमटा काढत भुजबळांनी फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी छगन भुजबळांनी जोरदार टोलेबाजी केली. आम्ही विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षानं ही गोष्ट लक्षात घ्यावी. आता विरोधकांनी आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. त्यासाठी रात्रीचे खेळ बंद झाले तर बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी कोपरखळी मारली. रात्रीचे खेळ करणारे करणारे नेते विरोधी पक्षात असल्यानं ही भीती व्यक्त करत असल्याचं ते पुढे म्हणाले. सत्ता असताना काहींनी माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मला राग नाही. माझा आवाज त्यामुळे कमी होणार नाही. सभागृहात असतो, तितकाच तो बाहेरदेखील असतो. असं भुजबळ यांनी म्हटलं. मी पुन्हा येईन यावरुनही भुजबळांनी फडणवीसांना टोला लगावला. आपण परत आलात. तुम्ही शब्द खरा करुन दाखवलात. विरोधी पक्षनेते हे मोठं पद आहे. तुमच्याकडे मंत्रिपदाचा दर्जा आहे. विरोधी पक्षनेत्याला अनेकांना अंगावर घ्यावं लागतं. नंतर त्याचा त्रास होतो. मात्र त्याशिवाय जनतेला न्याय देता येत नाही, याची मला जाणीव नाही. मी त्या पदावर काम केलं आहे, असं भुजबळ म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChhagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना