शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हेंची नावं निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 14:42 IST

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक; ११ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हेंची नावं निश्चित करण्यात आली आहेत. लवकरच विधानसभेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी लवकरात लवकर आमदार म्हणून निवडून येणं गरजेचं आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळणार असल्यानं विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणारी निवडणूक बिनविरोधच पार पडेल, अशी चिन्हं आहेत. भाजपने तसे संकेत आधीच दिले आहेत. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सहा जागा निवडून येतील, असा दावा केला आहे. आमच्याकडे असलेलं संख्याबळ पाहता सहा जागा निवडून शकतात. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येतील, असं थोरात म्हणाले. या संदर्भात लवकरच तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल, असंदेखील त्यांनी सांगितलं.गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीचे पाच, तर भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी किंवा शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ११ तारखेपर्यंत आहे.भाजपमध्ये चार जागांसाठी मोठी स्पर्धा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नवी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून नावे निश्चित करणार आहेत. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे हे माजी मंत्री भाजपमध्ये इच्छुक आहेत. खडसे यांचं राजकीय पुनर्वसन होते का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. बावनकुळे यांना संधी दिली जाऊ शकते. काँग्रेसमध्ये एका जागेसाठी १०० हून जास्त इच्छुक आहेत. अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली जात आहे.काय सांगते आकडेवारी?नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २९ मतांची आवश्यकता असेल. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावावर १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोट्या पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे ११२ मतं आहेत.विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपला चौथी जागा निवडून आणण्याकरिता चार मतं कमी पडत असली तरी गुप्त मतदान असल्यानं ही मतं मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, असं भाजपचे नेते ठामपणे सांगत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीला सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी १७४ मते लागतील. विश्वासदर्शक ठरावावर १६९ मतं मिळाली होती. परिणामी महाविकास आघाडीनं जोर लावल्यास सहावी जागा निवडून आणणं शक्य आहे. पण त्यासाठी मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणागरीब मजूरांकडून तिकीटाचे पैसे घेऊ नका, मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारला विनंती... तर लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरु, खासदार जलील यांचा इशारा

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरेNeelam gorheनीलम गो-हेShiv Senaशिवसेना