शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का?; कर्जमाफीवरुन राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 16:57 IST

ठाकरे सरकारचा कर्जमाफीचा निर्णय तकलादू; राजू शेट्टींची टीका

अमरावती : राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने ठाकरे सरकारचा हा निर्णय तकलादू आहे. निव्वळ शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी आणखी कर्जात गुंतत असताना सातबारा कोरा झाला का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने विदर्भ दौऱ्यावर असलेल्या शेट्टी यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही कर्जमाफींचा कित्येक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. एक लाखाच्या आत शून्य टक्के व दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी व्याज सवलत योजनेतून तीन टक्के व्याजाची आकारणी होते. यानंतरच्या रकमेवर शेतकऱ्यांना १२ ते १३ टक्के व्याज मोजावे लागते. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. आजही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दररोज १० शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. हे चित्र निराशाजनक असल्याचे शेट्टी म्हणाले.शेतकऱ्यांसाठी सध्या अत्यंत कठीण काळ आहे. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती व ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. रब्बीदेखील माघारला. शेती पिकांच्या नुकसानीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची मागणी राज्यपालांकडे केली होती. मात्र, सत्तेत येताच त्यांना याचा विसर पडला. या सरकारद्वारा घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. तूर, कापूस, सोयाबीन आदी शेतमालाला हमीभाव मिळत नाही. हमीभाव व प्रत्यक्ष विक्री झालेला दर यामधील तफावत शासनाने शेतकऱ्यांना द्यायला हवी, तरच भ्रष्टाचार थांबेल व शासनाची पै न पै मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले. 

आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी सीएएसध्या देशात वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदी, घसरला जीडीपी अशा अनेक समस्या आहेत. या समस्यांपासून देशातील नागरिकांचे लक्ष हटवण्यासाठी, जनतेला भावनिक प्रश्नात गुंतविण्यासाठी सीएए, एनआरसीसारखे विषय काढून माणसा-माणसांत भेदभावाचे वातावरण निर्माण केले जात आहे. कोंबड्यांसारखी झुंज लावली जात आहे. या सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आता देशात याचे विरोधात वातावरण तयार झाले आहे. ज्यांच्याजवळ मालमत्ता, शेती नाही, असे आदिवासी, भूमीहिन कुठून आणणार पुरावे? त्यांच्याकडे पुरावे नाहीत म्हणून त्यांना देशाबाहेर काढणार का, छावणीत ठेणार का, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Shettyराजू शेट्टी