शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

'मुख्यमंत्र्यांची वाटचाल बिकट वाटेवर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 05:09 IST

युती सरकारची चार वर्ष; धोरण लकवा संपला, निर्णयांना गती

- यदु जोशीमुंबई : एकीकडे सामाजिक आंदोलनाचा भडका, तर दुसरीकडे मित्र पक्षाचा सातत्याने त्रास आणि मंत्रिमंडळात ‘लॅक आॅफ टॅलेंट’ असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीचा धोरण लकवा संपवत निर्णयांचा सपाटा लावला. ‘टीम देवेंद्र’ मात्र चार वर्षांत दिसली नाही. दोन चार मंत्र्यांच्या कामगिरी पलिकडे मुख्यत्वे ‘वन मॅन शो’ असल्याचेच जाणवले.गेल्या चार वर्षात या सरकारने एकामागून एक निर्णयांचा धडाका लावला. चवथ्या वर्षात त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी स्वत: घेतला. ‘कलेक्टिव्ह डिसिजन’ हे खरे तर भाजपाचे वैशिष्ट्य. मात्र, सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कल्पनेतील निर्णय मुख्यत्वे घेतले. २०१४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ मांडले होते. त्यांच्या सरकारची चार वर्षांची वाटचाल मुख्यत्वे त्या व्हिजननुसारच राहिली.तडजोडी स्वीकारल्या नाहीतभाजपाला ग्राम पंचायतींपासून महापालिकेपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फडणवीस यांनी मोठे यश मिळवून दिले. खालपासून वरपर्यंतच्या निवडणुकांत राजकीय तडजोडी करण्याचे भाजपाच्या आधीच्या काही नेत्यांच्या चुकांना फाटा देत फडणवीस यांनी भाजपाला क्रमांक एकवर नेले. २०१९ च्या निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाकडे या लोकप्रतिनिधींचे मोठे नेटवर्क असेल. २०१४ च्या निवडणुकीत आणि आगामी निवडणुकीत तो मुख्य फरक राहील. ग्राम पंचायत ते महापालिकांपर्यंत यश मिळविताना इतर पक्षांतील लोकांना भाजपात आणले गेले.सामाजिक अस्वस्थतेचा सामनाया सरकारपुढे सामाजिक राजकीय आव्हानेही भरपूर राहिली. मराठा आणि अन्य समाजांनी काढलेले लाखोंच्या मोर्चांनी सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली. काही जणांचे जीवही गेले. कोरेगाव-भीमाची दंगल आणि त्यानंतरची परिस्थिती हाताळणे हे आणखी एक आव्हान होते. ही एकूण परिस्थिती फडणवीस यांनी कशी हाताळली यावर वाद होऊ शकतील पण त्याचा राजकीय फायदा विरोधकांना होऊ न देण्यात फडणवीस यशस्वी झाले.सेनेमुळे कामगिरी झाकोळलीचार वर्षांत शिवसेना हाच सरकारमधील मित्र पक्ष होता आणि शिवसेना हाच मुख्य विरोधी पक्ष होता. शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल ही भीती मुख्यमंत्र्यांना कधीही नव्हती पण असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी शिवसेनेने फडणवीस यांना वैताग आणला नसेल. सेनेच्या रोजच्या टीकेमुळे सरकारची चांगली कामगिरी झाकोळली गेली. मित्र पक्षाची योग्य साथ नसल्याने फडणवीस यांना अनेकदा तीन पायांची शर्यत खेळावी लागली.या मंत्र्यांवर झाले आरोपमाजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख आदी मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप झाले. पैकी खडसे यांना मंत्रिपद गमवावे लागले ; पण अन्य मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी बचाव केला.जनतेचा सहभाग वाढविलाजलयुक्त शिवार योजनेत ६०० कोटी रुपये लोकसहभागातून उभे झाले. आपलं सरकार पोर्टलवर साडेतीन लाख नागरिकांनी दिलेल्या तक्रारींचा निपटारा झाला. मुख्यमंत्री फेलोशिप योजनेत शेकडो गुणवंत विद्यार्थी सहभागी झाले. सरकार आणि सत्तापक्ष (भाजपा) यांच्यात संपर्काची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली गेली.सरकारचे चांगले निर्णयजलयुक्त शिवार योजना, मागील त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, सेवा हमी कायदा, मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचा प्रारंभ, मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरांतून २० लाख लोकांवर उपचार, मुख्यमंत्री सहायता निधीतून ४५० कोटींची मदत, अनाथांना आरक्षण, स्वच्छ भारत अभियानात ६० लाख शौचालयांची उभारणी, आपलं सरकार पोर्टलद्वारे ३.५० तक्रारींचा निपटारा.नामांकित शाळांमध्ये ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण.विरोधकांच्या नजरेतून सरकारहे तर खोटारडे सरकार : गेल्या चार वर्षाच्या काळात राज्यातील प्रश्न सुटण्याऐवजी अधिक बिकट झाले आहेत. केवळ घोषणा आणि भाषणे करण्यापलिकडे या सरकारने काहीही केलेले नाही. फडणवीस सरकारच्या काळात सोळा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकºयांची मुलेही आत्महत्या करू लागली आहेत. कर्जमाफीची घोषणा केली. पण अद्याप शेतकºयांना लाभ मिळाला नाही. मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. शेतकरी, कष्टकरी, तरूण विद्यार्थी, महिला या सर्व समाजघटकांची फसवणूक सरकारने केली आहे. राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप आहे पण सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री खोटे बोलून जनतेची फसवणूक करत आहेत. - खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेससरकार भाजपाचे, सेनेचे नाहीहे सरकार भाजपाचे आहे, शिवसेनेचे नाही. सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारला राष्टÑवादीने पाठींबा दिला होता. नंतर शिवसेना त्यात सामिल झाली. मात्र शिवसेनेने कायम जेथे चुकते तेथे विरोधकांची भूमिका ठामपणे मांडली. आम्ही आमच्यापध्दतीने काम करुन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करत आहोत. भाजपा शिवसेनेत मतभेद असले तरी आम्ही ते मंत्रीमंडळात मांडण्याचे काम केले आहे. मात्र भाजपा जेथे चुकले तेथे आम्ही त्यांना फटकारल्याशिवाय सोडले नाही.- दिवाकर रावते,परिवहन मंत्री, शिवसेना नेतेआर्थिक दिवाळखोरीया सरकारने राज्यावर करोडो रुपयांचे कर्ज करुन ठेवले. नियोजनाचा अभाव आणि कल्पकतेची वानवा यामुळे या सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीत नेले आहे. कापसावरील बोंडअळीला या सरकारने मदत दिली नाही. ८९ लाख शेतकºयांना ३५ हजार कोटींची कर्जमाफी करण्याच्या घोषणेला या दिवाळीला वर्ष होईल. पण अद्याप १५ ते १६ हजार कोटींच्या वरती हा आकडा गेला नाही. पुरवणी मागण्यांचा या सरकारने तर उच्चांक केला. दलित, मुस्लीम, धनगर समाजाला या सरकारने काहीही दिले नाही.- आ. जयंत पाटील,प्रदेशाध्यक्ष, राष्टÑवादी पक्ष

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस