शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Maharashtra Political Crisis: “बंडाची लढाई छोटी नव्हती, थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो”: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:35 IST

Maharashtra Political Crisis: सरकार, सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर वॉच होता. लढाई अवघड असली तरी आम्ही ती जिंकलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून  राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. बंडाची लढाई अजिबात छोटी नव्हती. थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. 

आम्ही बंड केले. ती लढाई काही छोटी नव्हती. लढाई खूप मोठी होती. तशी कठीणही होती. एकीकडे सरकार, सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर वॉच ठेवला जात होता. तर दुसरीकडे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. आम्हाला दगाफटका होईल असे वाटत होते. दगा फटक्याचा धोका होता. अशावेळी थोडे जरी इकडे तिकडे झाले असते, दगाफटका झाला असता तर शहीदच झालो असतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आम्ही बंड केल्यानंतर काय होईल, काय होईल, असे सर्वांना वाटत होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा आमच्याकडे लागल्या होत्या. पण लढाई अवघड असली तरी आम्ही त्यात यशस्वी झालो, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

देवीच्या आशीर्वादाने सगळे काही सुरळीत झाले

पद्मावती मंदिरात एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी एक छोटेखानी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना, बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता, असे सांगतानाच लोकांचा आणि देवीच्या आशीर्वादाने सगळे काही सुरळीत झाले, असे शिंदे म्हणाले. तसेच मी माझी मूळे विसरलो नाही. त्यामुळे माझ्या मूळ गावी आलो आहे. जनतेचा मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून मला गहिवरून आले आहे. माझ्या गावी आलोय. साताऱ्याचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. हे टुरिस्ट स्पॉट व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. 

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा येथील दरे या आपल्या गावी सहकुटुंब आले होते. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत केलं. यावेळी त्यांनी आपल्या कुलदैवतेचं दर्शन घेतले. त्यानंतर ते तापोळा येथे आले होते.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेSatara areaसातारा परिसर