शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फडणवीसांनी दिलेली स्क्रिप्ट वाचणारा बोलका पोपट"; काँग्रेसचा बोचरा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 19:00 IST

Shinde Fadnavis vs Congress: महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपाबरोबर कसली सन्मान यात्रा काढता?, असाही केला सवाल

Eknath Shinde Devendra Fadnavis vs Congress: राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केला असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सुरात सुर मिसळला आहे. भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीमाई,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा अपमान केला हे जनता अजून विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर टीका करणाऱ्या विचारधारेच्या लोकांसोबत सत्तेत एकत्र बसलेले एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचणारा बोलका पोपट आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले, "पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीसांना दिलेली स्क्रिप्ट वाचू का ? असे विचारून बोलणा-या एकनाथ शिंदे यांनी सावरकर गौरव यात्रा काढण्यापूर्वी सावरकरांचे ‘ सहा सोनेरी पाने’ पुस्तक वाचावे. या पुस्तकात सावरकर शिवरायांबद्दल म्हणतात, "काकतालीय नितीप्रमाणे (कावळा बसायला आणि फांदी तुटायला याप्रमाणे) शिवाजी राजा झाला. नायतर त्याची योग्यता नव्हती". तसेच छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल 'हिंदुपद पातशाही' या पुस्तकात सावरकर लिहतात की, "मदिरा आणि मदिराक्षीत कैकाड बुडालेला नादान नाकर्ता राजपुत्र संभाजी". सावरकरांची छत्रपतींबद्दलची ही विधाने एकनाथ शिंदे यांना मान्य आहेत का? हे त्यांनी यात्रे आधी जाहीर करावे."

"राहुल गांधी यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सांगण्यावरून टीका करणे योग्य नाही. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल जे विधान केले ते वास्तव आहे, त्यात चुकीचे काय ? असा सवाल विचारून लोंढे म्हणाले की, भाजपाने सातत्याने महापुरुषांचा अपमान केला त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे हे सन्मानयात्रा कशी काढतात, याची वाट राज्यातील जनता पहात आहे," असेही लोंढे म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस