शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 17:26 IST

CM Eknath Shinde in Dharashiv : 'उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार विकायला निघाले होते, तेव्हा आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं.'

CM Eknath Shinde in Dharashiv : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने आहेत. दरम्यान, शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रचाराचा धडाका लावला आहे. आज त्यांनी मंत्री तानाजी सावंत  (Tanaji Sawant) यांच्या प्रचारार्थ धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

बाळासाहेबांचे विचार विकायला निघालेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकायला निघाले होते, तेव्हा आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं. त्यावेळी तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्याचं भाग्य मला मिळालं. पुर्ण बहुमताचं सरकार आणल्यावर आम्ही उस्मानाबादच धाराशिव आणि औरंगाबादच छत्रपती संभाजीनगर नामकरण करुन बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण केलं.' 

ठाकरेंची आग लावणारी मशाल'धनुष्यबाण आमचा आहे, असं म्हणणाऱ्यांनी आपली मशालसुद्धा आता दुसऱ्याच्या हातात देऊन टाकली आहे. ठाकरेंची मशाल ही क्रांतीची मशाल नाही, तर ती घराघरात आणि समाजासमाजात आग लावणारी मशाल आहे. गेल्या अडीच अडीच वर्षांच्या काळातील मविआ आणि महायुतीने केलेली कामं जनतेने बघावी. त्यांनी अडीच वर्ष फक्त कामांना स्टे दिला आणि आम्ही आमच्या कार्यकाळात राज्याचा विकास केला,' अशी घणाघाती टीका शिंदेंनी यावेळी केली.  

तानाजी सावंतांना पुन्हा मंत्री करणारयावेळी एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंतांना पुन्हा मंत्री करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, 'परंड्याच्या जनतेच्या मनात काय आहे, हे या गर्दीने दाखवून दिलंय. हा एकनाथ शिंदे 23 तारखेला तुमच्यासोबत परांड्यात फटाखे फोडायला येतोय. तुम्ही तानाजीरावांना पुन्हा आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी,' असा शब्द एकनाथ शिंदे यांनी परंडा येथील जाहीर सभेतून दिला. दरम्यान, परांडा येथे तानाजी सावंत यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राहुल मोटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाdharashivधाराशिवTanaji Sawantतानाजी सावंत