शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

विरोधक आक्रमक, कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस बांधावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 06:16 IST

मौदा तालुक्यातील शेतीची केली पाहणी

कमलेश वानखेडेनागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधकांनी शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असल्याची टीका केली. तर सभागृहाचे कामकाज संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. मौदा तालुक्यातील तारसा निमखेडा या गावांना भेटी देत त्यांनी शेतीची पाहणी केली.

गुरुवारी विधानसभेचे कामकाज तहकुब होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची चर्चा केली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार कृपाल तुमाने, आ. आशिष जायस्वाल, आ. टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्यासह कृषी, पणन, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यात २६ ते २८ नोव्हेंबर या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जवळपास १२४ गावांना फटका बसला व ८५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले. रामटेक, पारशिवणी तालुक्यातही नुकसान झाले. धानासोबतच कापूस, तूर, संत्रा पिकांचेही नुकसान झाले. 

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : फडणवीस केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. इतर तालुक्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली. १२०० मंडळे दुष्काळसदृश जाहीर केली. त्यांनाही दुष्काळाच्या धर्तीवरच मदत करण्यात आली. मागे १० हजार कोटी दिले. यावर्षीही २० लाख शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम दिले, असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले ते म्हणाले, दुष्काळ, गारपीट, अवकाळी नुकसान अशा सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने कारवाई सुरू झाली आहे. मागे शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली. राज्य सरकारने मदतीसाठी दोन ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा वाढवली असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन