मराठी नववर्षाचा संकल्प काय? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या विकासाची गुढी...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:59 IST2026-03-19T13:58:55+5:302026-03-19T13:59:10+5:30

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

cm devendra fadnavis told about what is the hindu marathi new year resolution | मराठी नववर्षाचा संकल्प काय? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या विकासाची गुढी...”

मराठी नववर्षाचा संकल्प काय? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या विकासाची गुढी...”

CM Devendra Fadnavis: संपूर्ण महाराष्ट्रात मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचा उत्साह दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक नेतेमंडळी, सेलिब्रिटी या शोभायात्रांमध्ये सहभागी होत नववर्षाचे उत्साहात स्वागत करताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोभायात्रेत सहभाग घेतला आणि मराठी नववर्षाच्या संकल्पाबाबतही सांगितले.

मी सर्व हिंदूंना नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. आजचा दिवस आपण सगळे साजरा करतो. अतिशय चांगली शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहण्यास मिळतो आहे. पारंपारिक वेशभुषेत माता, भगिनी, मुले पाहण्यास मिळतात. साहसी खेळ सादर केले जातात. एक मोठा आनंद साजरा झालेला पाहण्यास मिळतो. त्यामुळे मी दरवर्षी या शोभायात्रेत येत असतो. इथली भव्यता पाहण्यास मिळते आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

विकास आणि वारसा याबाबत पंतप्रधान मोदी कायम सांगतात

विकास आणि वारसा याबाबत पंतप्रधान मोदी कायम सांगत असतात. वारसा म्हणजे आपली संस्कृती. आधुनिकता जपत असताना संस्कृतीही सांभाळायची असते. नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की, महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे. जी गुढी उभारण्यात आली आहे, ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाची गुढी आहे. ती अशीच उंच-उंच होत राहो या शुभेच्छा देतो, असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलो. प्रत्येक मराठी माणसासाठी हिंदू माणसासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजपासून नवे संकल्प सुरू करत असतो. नवीन आशा, नवीन पहाट घेऊन आयुष्याला सामोरे जात असतो. सगळेजण या ठिकाणी पारंपारिक वेशात येऊन शोभायात्रेला मंगलमय बनवतात. जय श्रीरामचे नारे, दोरीवरचा मल्लखांब करणाऱ्या आपल्या छोट्या बहिणी, ढोल पथके या सगळ्यांनी सुंदर कार्यक्रम यशस्वी केला आहे. सगळ्यांचे कौतुक करतो, असे ते म्हणाले.

Web Title : सीएम फडणवीस: मराठी नव वर्ष संकल्प महाराष्ट्र का विकास

Web Summary : सीएम फडणवीस ने मराठी नव वर्ष मनाया, महाराष्ट्र के विकास पर जोर दिया, परंपरा को आधुनिकता के साथ मिलाया। उन्होंने पीएम मोदी के संस्कृति में निहित प्रगति के दृष्टिकोण पर प्रकाश डाला।

Web Title : CM Fadnavis: Marathi New Year Resolution is Maharashtra's Development

Web Summary : CM Fadnavis celebrated Marathi New Year, emphasizing Maharashtra's development, blending tradition with modernity. He highlighted PM Modi's vision of progress rooted in culture, aiming for transformative growth.