"राज्यावर कर्ज वाढतंय याची चिंता करण्यापेक्षा..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:20 IST2026-03-11T18:14:25+5:302026-03-11T18:20:55+5:30

Devendra Fadnavis on Maharashtra Budget: अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ते विधानसभेत बोलत होते.

cm devendra fadnavis said we should think about where the borrowed money is being spent rather than worrying about the increasing debt of maharashtra | "राज्यावर कर्ज वाढतंय याची चिंता करण्यापेक्षा..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

"राज्यावर कर्ज वाढतंय याची चिंता करण्यापेक्षा..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

Devendra Fadnavis on Maharashtra Budget: आपले महाराष्ट्र राज्य अतिशय वेगाने व झपाट्याने प्रगती करत आहे. महाराष्ट्र हा जर देश असता तर आपण जगातील ३०वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असतो. ज्या राज्यांची कर्ज परतफेडीची क्षमता २५ टक्क्यांपेक्षा कमी असते, ती राज्ये चांगली कामगिरी करत आहेत, असे म्हटले जाते. महाराष्ट्राची ही क्षमता १८ टक्के आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुदृढ आहे. राज्यावर कर्ज वाढतंय याची चिंता करण्यापेक्षा ते कुठे खर्च होतंय याची चिंता करणे गरजेचे आहे, अशा शब्दांत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधकांना सुनावले.

"जीडीपीच्या तुलनेबाबत पहिल्या ३५ देशांचा विचार केला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ऑस्ट्रिया, थायलंड, फिलिपिन्स, नॉर्वे, व्हिएतनाम, बांगलादेश यांच्यापेक्षाही मोठी झाली आहे. आपण जर आपला विकासदर कायम राखू शकलो तर पुढच्या दोन ते तीन वर्षात आपण युएई आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थानांही निश्चित मागे टाकू", असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते.

"सहसा राज्याची राजकोषीय तूट ही ३ टक्क्यांपेक्षा कमी असावी असे म्हणतात. महाराष्ट्राने विविध योजना चालवल्या, तरीही आपली राजकोषीय तूट ही २.७८ टक्के म्हणजेच ३ टक्क्यांच्या आत आहे. तसेच आपली महसुली तूट १ टक्क्यांच्या आत ठेवण्यातही आपल्याला यश आले आहे", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

"२०१३-१४ साली राज्याचा जीएसडीपी १६ लाख कोटी रुपये होता. गेल्या १० वर्षात राज्याचा जीएसडीपी १६ लाख कोटींहून ५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. १० वर्षांत मराहाष्ट्राची तीन पट अधिक वाढ झाली आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न ३ लाख १७ हजार ८०३ रुपयांवरून ३ लाख ४७ हजार ९०३ रुपये इतके वाढलेले दिसत आहे. मात्र दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमाकांवर आहे," असे त्यांनी सांगितले.

"आपल्या राज्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विचार केला तर आपला विकासदर खूप चांगला आहे. राज्य जितके मोठे तेवढा विकासाचा दर कमी असतो, पण महाराष्ट्राने आपला विकासदर कायम ठेवला आहे", असेही फडणवीस म्हणाले.

Web Title : कर्ज नहीं, खर्च पर ध्यान दें: फडणवीस का विपक्ष को जवाब।

Web Summary : महाराष्ट्र की अर्थव्यवस्था मजबूत है, कर्ज चुकाने की क्षमता 18% है। विकास कई देशों से बेहतर है; जीएसडीपी एक दशक में तीन गुना बढ़कर ₹51 लाख करोड़ हो गया। राजकोषीय घाटा 3% से कम है।

Web Title : Focus on spending, not debt: Fadnavis to opposition.

Web Summary : Maharashtra's economy is strong, with debt manageable at 18% of repayment capacity. Growth outperforms many nations; GSDP tripled in a decade, reaching ₹51 lakh crore. Fiscal deficit remains under 3%, showcasing robust economic management.