शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:43 IST

CM Devendra Fadnavis On Sunetra Pawar Oath Ceremony: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.

CM Devendra Fadnavis On Sunetra Pawar Oath Ceremony: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी  त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली.  अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनील तटकरे यांनी अतिशय गलिच्छ राजकारण केले आहे. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडले, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. रामदास कदम यांनी केलेल्या टीकेबाबत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. 

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

मला असे वाटते की, याबाबत जो काही वाद होत आहे, तो अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे. अतिशय चुकीच्या प्रकारचा हा वाद-विवाद होत आहे. प्रत्येक व्यक्ती स्वत:चे राजकारण यात कसे करता येईल, हाच प्रयत्न करत आहे. पण हे अतिशय चुकीचे आहे. राज्यातील मोठे नेते अजित पवार हे आपल्यातून निघून गेले आहेत आणि त्यानंतर प्रत्येक व्यक्ती राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचे आहे. अशा प्रकारचे खालच्या पातळीचे राजकारण बंद झाले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, प्रसंग कठीण होता. पण, ज्या धीरोदात्तपणे सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही. पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Controversy over Sunetra Pawar's oath; Fadnavis clarifies, strongly responds.

Web Summary : Fadnavis dismisses controversy surrounding Sunetra Pawar's deputy CM oath as pointless political maneuvering after Ajit Pawar's unfortunate passing. He lauded Sunetra Pawar's courage and commitment to Maharashtra, while assuring support from the BJP and the Mahayuti government.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा