शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

परतूरमध्ये कडकडीत बंद

By admin | Updated: February 21, 2017 04:04 IST

शहरात रविवारी रात्री झालेल्या हिंसाचारानंतर सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. रात्री लागू करण्यात

परतूर (जि.जालना) : शहरात रविवारी रात्री झालेल्या हिंसाचारानंतर सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. रात्री लागू करण्यात आलेली संचारबंदी सकाळी सातच्या सुमारास उठविण्यात आली. तर, शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेकप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून परतूर पोलीस ठाण्यात ३४ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मलंगशहा चौकात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीत काही कारणावरून दोन गटांत वाद झाला. त्याचवेळी एका गटाने मिरवणुकीवर तुफान दगडफेक केली. त्यातून तणाव निर्माण झाला. पोलिसांची कुमक पुरेशी नसल्याने दोन्ही परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही. यातच जमावाने परिसरातील हॉटेल, मंडप डेकोरेशनची दोन दुकाने तसेच काही वाहनांची तोडफोड करून आग लावण्यात आली. पोलीस स्टेशन चौकातही बाटल्या व दगडांचा मारा करून जमावाने तोडफोड केली.  तब्बल दीड ते दोन तासानंतर दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाच्या तुकड्या, पोलिसांची  कुमक आल्यानंतर परिस्थितीवर पोलिसांना नियंत्रण मिळविले. यामध्ये पोलीस कर्मचारी-अधिकारी, होमगार्ड यांच्यासह सात ते  आठजण जखमी झाले आहेत. (वार्ताहर)