शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

गढूळ राजकारण स्वच्छ करणार : आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 5:01 AM

‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी मेळाव्याला अनुपस्थित

सातारा : ‘साताऱ्याचा इतिहास परिवर्तन व पुरोगामी चळवळीचा आहे. पण येथे प्रतिगामी बसलेत की काय हेच समजत नाही. पाणी गढूळ झालं की त्यात अळ्या होतात. असं पाणी फेकून भांडं स्वच्छ करावं लागतं. त्याचप्रकारे वंचित बहुजन आघाडी गढूळ पाणी स्वच्छ करायला निघालीय. त्यासाठी नव्या दमाची माणसं आम्ही उभी करणार आहोत,’ असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.येथील गांधी मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, पार्थ पोळके, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, हाजी अस्लम सय्यद यांच्यासह राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘९० दिवसांवर लोकसभा निवडणूक आली आहे. पण या देशाला अर्थमंत्री नाही. देशाचं महत्त्वाचं खातं असणारा अर्थ विभागच रामभरोसे असेल तर कसं चालायचं. या सरकारच्या काळात उजवा आणि डावा हात काय करतोय, तेच कळत नाही. त्याचबरोबर भाजप सरकारनं सवर्णांना १० टक्के आरक्षण दिलंय. यामुळे आमच्या पोटात दुखत नाही. पण यामुळे देशातील वैचारिक दिवाळखोरी समोर आलीय. कारण आरक्षण हे विकासाचं साधन नाही तर आश्वासन आहे. या सरकारला काय करावं आणि काय नको हेच कळेनासं झालंय. देशाच्या संविधानानं विकासाची दारं उघडतात; पण हे सरकार तेच बदलायला निघालंय. संविधान चिरंतन राहील, अशी भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठीच बहुजन वंचित आघाडी निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे.या वैचारिक दिवाळखोरीच्या सरकारला बदलण्यासाठी आता नव्या सोशल अजेंड्याची गरज आहे, तेच आता करावे लागणार आहे, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यातून आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, या मेळाव्यात पार्थ पोळके यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.ओवैसींची अनुपस्थिती‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी हे मेळाव्याला येऊन मार्गदर्शन करणार होते. त्यादृष्टीने सर्व नियोजन झाले होते. पण ते या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे उपस्थितांची नाराजी झाली.आंबेडकर सोलापुरातूनही उभे राहणारमाजी आमदार लक्ष्मण माने यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकर हे अकोल्याबरोबरच सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनही उभे राहणार आहेत. आता यामुळे समोरच्यांचा ब्लड प्रेशर वाढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही प्रचारालाही येऊ नका, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, असेही त्यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी