दहावीची फेरपरीक्षा १८ जुलैपासून होणार

By Admin | Updated: June 10, 2016 05:13 IST2016-06-10T05:13:44+5:302016-06-10T05:13:44+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्रची (दहावी) फेरपरीक्षा जुलै-आॅगस्ट २०१६ मध्ये घेण्यात येणार

The Class XII examinations will be held from July 18 | दहावीची फेरपरीक्षा १८ जुलैपासून होणार

दहावीची फेरपरीक्षा १८ जुलैपासून होणार


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्रची (दहावी) फेरपरीक्षा जुलै-आॅगस्ट २०१६ मध्ये घेण्यात येणार आहे. या फेरपरीक्षेतील लेखी व अन्य परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने गुरुवारी जाहीर केले. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाईल.
मंडळाने जाहीर केलेल्या परीक्षेचे दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वेळापत्रकानुसार दहावीच्या लेखी, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी इ. परीक्षांच्या तारखा निश्चित केल्या आहेत. संकेतस्थळावरील वेळापत्रक फक्त माहितीसाठी आहे. लेखी परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळांकडे विभागीय मंडळांमार्फत देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतीम असेल, असेही मंडळाने सांगितले.
विद्यार्थ्यांनी शाळांना मंडळामार्फत वाटप करण्यात येणाऱ्या छापील वेळापत्रकावरुन खात्री करुन घेण्याचे आवाहनही मंडळाने केले आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असा सल्लाही मंडळाने दिला आहे. (प्रतिनिधी)
>अशी असेल फेरपरीक्षा
लेखी परीक्षा : १८ जुलै ते ३ आॅगस्ट,
विज्ञान आणि तंत्रज्ञान व माहिती संप्रेषण तंत्रज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा : १८ जुलै ते ३ आॅगस्ट
श्रेणी/तोंडी परीक्षा : ९ ते १६ जुलै
पुर्व व्यवसायिक परीक्षा :
९ ते १६ जुलै
अंध व अपंगांसाठी कार्यानुभव :
९ ते १६ जुलै
तंत्र व पुर्व व्यवसायिक प्रात्यक्षिक परीक्षा : ९ ते १६ जुलै
अंध/अपंग विद्यार्थ्यांसाठी शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा : १६ जुलै
आऊट आॅफ टर्न परीक्षा : ५ आॅगस्ट

Web Title: The Class XII examinations will be held from July 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.