शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:04 IST

Maharashtra SSC Result 2025 Date And Time : १३ मे रोजी दुपारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे. 

Maharashtra SSC Result 2025 Date : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीच्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. एकीकडे सगळ्या बोर्डांचे निकाल जाहीर आहेत. या दरम्यान आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याची अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे. 

यंदाच्या वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आता उद्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. १३ मे रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यात निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.

कधी आणि कसा तपासाल निकाल? दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर लॉगिन करून आपला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, results.targetpublications.org आणि sscresult.mkcl.org या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहे. या वेबसाईटवर निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे.  ऑनलाइन मार्कशीटमध्ये विषयवार गुण, जन्मतारीख आणि रोल नंबर समाविष्ट असेल.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालssc examदहावीMaharashtraमहाराष्ट्रResult Dayपरिणाम दिवस