दोन गटांत हाणामारी ; चिंचवडगावात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 23:33 IST2017-09-07T23:33:03+5:302017-09-07T23:33:13+5:30

चिंचवडगाव, पागेची तालिम  येथील  भैरवनाथ मंदिराजवळ एका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबर दुसºया गटातील टोळक्याची भांडणे झाली.

Clashes in two groups; Trench in Chinchwadgaon | दोन गटांत हाणामारी ; चिंचवडगावात तणाव

दोन गटांत हाणामारी ; चिंचवडगावात तणाव

पिंपरी, दि. 7 - चिंचवडगाव, पागेची तालिम  येथील  भैरवनाथ मंदिराजवळ एका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबर दुस-या गटातील टोळक्याची भांडणे झाली. दहशत माजविण्याच्या उद्देशाने टोळक्याने परिसरातील मोटारींची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या भांडणात एकजण गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने वायसीएम  रूणालयात नेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  

गणेशोत्सव शांततेत पार पडला मात्र तिस-याच दिवशी चिंचवडगावात घडलेल्या या भांडणाच्या घटनेने वातावरण बदलून गेले. तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पुर्वी झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी होण्याचा प्रकार घडला. हातात लाकडी दांडके घेऊन खुलेआम फिरणा-या टोळक्याने परिसरातील १३ मोटारींचे नुकसान केले. रात्री दहानंतर या परिसराचे चित्रच पालटून गेले. साडेदहाच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले. 

Web Title: Clashes in two groups; Trench in Chinchwadgaon