शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षक घरी बसून तपासणार; राज्य सरकारचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 5:19 PM

राज्य मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार काही शिक्षकांनी केले घरी बसून उत्तरपत्रिका तपासणीचे काम

ठळक मुद्देउत्तरपत्रिकांचे मूल्यमापन कालावधीत पूर्ण न झाल्यास निकाल जाहीर करण्यास विलंबसर्व शिक्षकांनी या उत्तरपत्रिका काळजीपूर्वक हाताळणे बंधनकारक

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या मूल्यमापनाचे काम आता शिक्षकांना घरी बसून करता येणार आहेत. राज्य मंडळाने याबाबत सर्व विभागीय मंडळांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे काही शिक्षकांनी घरी बसून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम शिक्षकांना घरी बसून करता यावे,यासंदर्भात राज्य शासनाने राज्य मंडळाला आदेश द्यावेत,असे निवेदन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले होते. दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका होलो क्राफ्ट स्टीकर व बारकोड असल्याने कोणत्याही गोपनीयतेचा भंग होणार नाही. त्यामुळे शिक्षकांना उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी 'वर्क फ्रॉम होम' चा आदेश निर्गमित करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते. राज्य शासनाने शिक्षक महासंघाची मागणी नुकतीच मान्य केली आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून राज्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही परीक्षासुद्धा स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन उत्तरपत्रिकांची तपासणी करणे शिक्षकांना शक्य होत नाही. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन योग्य कालावधीत पूर्ण न झाल्यास दहावी ,बारावीचा निकाल जाहीर करण्यास विलंब होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन शासनाने शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी तपासण्यास देण्याचा निर्णय घेतला.------------महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले म्हणाले, शिक्षकांना उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन घरी बसून करता येऊ शकते.शासनाकडून याबाबत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सर्व विभागीय मंडळांना या संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.--------------------------शिक्षकांना घरी बसून उत्तरपत्रिका तपासता येतील. मात्र, सर्व शिक्षकांनी या उत्तरपत्रिका काळजीपूर्वक हाताळणे बंधनकारक आहे. शाळा महाविद्यालयांमधून शिक्षकांनी मोजून उत्तरपत्रिका घेऊन जाव्यात आणि मोजून जमा कराव्यात. तसेच उत्तरपत्रिका तपासताना आपल्या घरी बाहेरील व्यक्तीला प्रवेश देऊ नये,अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. तुकाराम सुपे,अध्यक्ष,पुणे विभागीय शिक्षण मंडळ--------------इयत्ता बारावीच्या सुमारे 60 टक्के उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित उत्तरपत्रिका शिक्षक घरी घेऊन आले आहेत. त्यामुळे सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी करून निकाल नियोजित कालावधीमध्ये जाहीर करण्यास अडचण येणार नाही. - संतोष फाजगे, सचिव, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाResult Dayपरिणाम दिवसStudentविद्यार्थीTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र