शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Chipi Airport Inauguration:...म्हणून Jyotiraditya Scindia यांनी चिपी विमानतळाच्या उदघाटनाला प्रत्यक्ष उपस्थिती टाळली, समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 08:40 IST

Chipi Airport Inauguration: मंत्री Jyotiraditya Scindia हे सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार होते. मात्र अगदी ऐनवेळी या सोहळ्यात ऑनलाइन सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला, अशी कुजबुज आहे.

मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार होते. मात्र अगदी ऐनवेळी या सोहळ्यात ऑनलाइन सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला, अशी कुजबुज आहे. शिंदे भाषणात बोलले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सहकारी होते त्यात एकीकडे पेशवे होते तर दुसरीकडे शिंदे, होळकर होते. त्यांनी मिळून ब्रिटिश, पोर्तुगीज यांच्या फौजांशी सामना केला. मात्र प्रत्यक्षात चिपीत एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मधोमध आपल्याला बसवले जाणार. राणे व ठाकरे परस्परांवर टीकास्त्र सोडणार व व्यासपीठावर बोलताना आपण दोघांपैकी कुणाहीकडे झुकलो तर दुसरा नाराज होणार. त्यामुळे सिंदिया यांनी राज्यातील एका मातब्बर मंत्र्याला विनंती करून ऑनलाइन सहभागाची विनंती केली. शिंदे यांची अडचण ओळखून मग त्यांच्या दिल्लीतून सहभागाची विनंती मान्य केली. ठाकरे-राणे यांच्यात पोलिटिकल डिस्टन्सिंग राखून मधोमध भली मोठी समई लावण्याची शक्कल ज्याने लढवली त्याच्या कल्पनेला खरोखरच दाद दिली पाहिजे. 

ईडी, आयटी छाप्यांचा परिणाम !बऱ्याच मंत्री कार्यालयांमध्ये सध्या जरा भीतीचं वातावरण बघायला मिळतं. काही मंत्र्यांचे पीए, पीएस, स्टाफमधील कर्मचारी मोबाईलवर बोलताना सांभाळूनच बोलतात. काहीजण सुरक्षित पर्याय म्हणून व्हॉट्सॲपवर बोलतात. व्हॉट्सॲप मेसेजेस लगेच डीलीट करण्याची काळजी घेतात. मध्येच कोणीतरी सांगतं की, व्हॉट्सॲप कॉलपण सुरक्षित नसतात, त्यांचंही रेकॉर्डिंग केलं जातं. त्यापेक्षा ॲपल फोन घेऊन फेसटाईमवरून कॉल करा. फेसटाईमवर कॉल बरेच दिवस केल्यानंतर हळूच कोणीतरी सांगतं की, तेही सुरक्षित नाही. मग कुठून तरी कोणीतरी सल्ला देतं की, बाबा रे, टेलिग्राम हा ॲप डाऊनलोड करून घे अन् त्यावरून बोलत जा! त्यावरून कॉल केला तर त्याचे रेकॉर्डिंग होत नाही. या ईडी अन् आयकर खात्याच्या छाप्याचा हा परिणाम दिसतो. मोबाईलवरून बोलणंच सुरक्षित नाही, ‘गड्या आपला गाव बरा’सारखं ‘गड्या आपला लँडलाइन बरा’ असा सल्ला मग कुणीतरी देतं, मग लँडलाइनचा आधार घेणं सुरू होतं. काय दिवस आलेत बघा! (या सदरासाठी यदु जोशी, संदीप प्रधान यांनी लेखन केले आहे.  श्रेयनामावली मजकुराच्या क्रमानुसार असेलच असे नाही.)

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेPoliticsराजकारण