शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चीनी प्रवाशाचा ' कोरोना ' संदर्भातील अहवाल आला निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 17:24 IST

राज्यासह पुणेकरांना सोडला सुटकेचा नि:श्वास 

ठळक मुद्देपुण्याला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका चिनी प्रवाशाला उलट्यांचा झाला होता त्रास

पुणे : कोरोना विषाणूने चीनमध्ये हाहाकार माजवलेला असतानाच दिल्लीहून पुण्याला येणारे विमानही शुक्रवारी (दि. ७ ) याच कारणामुळे हादरून गेले. निमित्त झाले ते विमानात उलटी झालेल्या प्रवाशाचे. पण, हा प्रवासी चीनी असल्यामुळे त्याच्या उलटीकडे ‘कोरोना’च्या संशयावरून पाहिले जात होते.त्यामुळेच विमान उतरल्यानंतर तातडीने उलटी करणाऱ्या चीनी प्रवाशाला तातडीने नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, आता त्या चीनी प्रवाशाचा ‘कोरोना ’संदर्भातील अहवाल हा निगेटिव्ह आला असल्याची माहिती वरिष्ठ  वैद्यकीय आधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह संपूर्ण राज्यानेच सुटकेचा नि: श्वास सोडला आहे. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत पाचशेहून अधिक नागरिकांचा जीव घेतला आहे. चीनमधील वुहान प्रांतातून या विषाणूचा प्रसार झाला. भारतात हा विषाणू पसरू नये, यासाठी विमानतळावर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतून पुण्याला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका चिनी प्रवाशाला उलट्यांचा त्रास झाला. सकाळी सात वाजता पुण्यात येणारे विमान साडेसात वाजता पुण्यात पोहोचले. हे विमान पुन्हा लगेच दिल्लीकडे उड्डाण करणार होते; परंतु प्रवाशाने विमानातच उलटी केल्याने खबरदारी म्हणून जंतुनाशकाद्वारे विमानाची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे सकाळी पावणेआठच्या सुमारास दिल्लीकडे जाणारे हे विमान दुपारी २ वाजून २४ मिनिटांनी दिल्लीच्या दिशेने हवेत झेपावले. दरम्यान, चिनी प्रवाशाच्या अस्वस्थतेबाबात वैमानिकाने विमानतळ प्रशासनाला कळविले होते. त्यामुळे विमान पुण्यात उतरण्याआधीच डॉक्टरांची टीम लोहगाव विमानतळावर तैनात करण्यात आली होती. विमान उतरल्यानंतर त्या चीनी प्रवाशाला तात्काळ नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर, विमानातील इतर प्रवाशांना काही त्रास झाला नाही ना, याची खबरदारी घेण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानchinaचीन