शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

कोवळ्या वयामध्येच मुलींचे हात पिवळे! मराठवाड्यामध्ये बालविवाह सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 5:47 AM

Child Marriage : विशेष म्हणजे टॉप १० जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील सर्वच आठही जिल्ह्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

- सोमनाथ खताळ

बीड : पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही बालविवाहाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ (२०१९-२०) मधून अधोरेखित झाले आहे. अल्पवयीन मुलींचे हात पिवळे करून त्यांना बोहल्यावर चढविण्यात राज्यात सर्वांत आघाडीवर मराठवाडा आहे. यात परभणी जिल्हा अव्वल आहे. विशेष म्हणजे टॉप १० जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील सर्वच आठही जिल्ह्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असलेला बीड जिल्हा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ४ मध्ये बालविवाह लावण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, नव्या सर्वेक्षणात बीड जिल्हा दुसऱ्या स्थानावर आला आहे. तिथे बालविवाहांच्या प्रमाणात घट होत आहे.धुळे तिसऱ्या तर सोलापूर चौथ्या स्थानावर आहे. इतर जिल्ह्यांना हे प्रमाण कमी करण्यात यश आले असले तरी राज्यात बालविवाह थांबले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आजी मरायच्या आत नातीचे लग्न...बालविवाहाचे मूळ कारण परिस्थिती आहे. ऊसतोडणीला जाताना जोडीला जास्त उचल मिळते म्हणून लग्न लावून दिले जाते. तसेच आजी मरायच्या आत नातीचे लग्न व्हावे, कमविणारा अथवा नाेकरदार मुलगा भेटल्यास, कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यास एक वर्षाच्या आत लग्न लावणे, यासारख्या कारणांनी मुलींचे बालवयातच लग्न लावले जाते.

२०२१ या वर्षात बीड जिल्ह्यात जवळपास २०० बालविवाह रोखण्यात यश आले आहे. एकट्या मे महिन्यात ८३ विवाह रोखले.- तत्त्वशील कांबळे, राज्य बालहक्क कार्यकर्ता

बालविवाहाचे प्रमाण बीडमध्ये कमी झाले आहे. बालविवाह रोखण्यासाठी तिथे सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.- सोनिया हांगे, प्रकल्प समन्वयक, युनिसेफ, बीड

बालविवाहांची आकडेवारी

जिल्हा    सर्वेक्षण    सर्वेक्षण                 क्र. ५    क्र. ४परभणी    ४८    ४५बीड    ४३    ५२धुळे    ४०    ३५सोलापूर    ४०    ३७हिंगाेली    ३८    ४१उस्मानाबाद    ३७    ३१औरंगाबाद    ३६    ४५जालना    ३५    ५०नांदेड    ३४    ४२लातूर    ३३    ३७

टॅग्स :marriageलग्न