शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाने बनविले मुलाला डॉक्टर

By admin | Updated: June 15, 2014 00:45 IST

जीवनात माणूस अपेक्षांवर जगतो. त्या पूर्ण झाल्या की, जीवनात काहीतरी जिंकल्याचं समाधान मिळतं. आयुष्यभर संकटं झेलणाऱ्या या बापाची कहाणीही संघर्षमयच आहे, त्या संघर्षाला जिद्दीची जोड आहे.

गोपाल देशमुखचा संघर्षमंगेश व्यवहारे - नागपूर जीवनात माणूस अपेक्षांवर जगतो. त्या पूर्ण झाल्या की, जीवनात काहीतरी जिंकल्याचं समाधान मिळतं. आयुष्यभर संकटं झेलणाऱ्या या बापाची कहाणीही संघर्षमयच आहे, त्या संघर्षाला जिद्दीची जोड आहे. इमानदारीतून कमावलेल्या या चार पैशानेच त्याला पोराला डॉक्टर करता आले. पोरगा मोठा झाला. त्याने नाव केलं, याचं समाधान त्याच्या डाव्या कडा पाणावल्या की दिसून येतं. त्या संघर्षाची, जिद्दीची अन् त्याच्यातल्या बापाची ही कहाणी. मुलांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारा हा बाप आहे गोपाल देशमुख. गोपाल सायकलरिक्षा चालवून तीन मुले व बायको असा कुटुंबाचा गाडा ओढायचा. मात्र मुले मोठी हुशार, पण शिक्षणासाठी पैसा नव्हता. त्यामुळे कार्पोरेशनच्या शाळेतून मुलांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. रिक्षातून मिळालेला पैसा हा त्याच्या कुटुंबाच्या गरजाही भागवू शकत नव्हत्या. मात्र मुलांची हुशारी, त्यांची धडपड बघून त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याकडून होईल ती मेहनत घेण्याची बापाची तयारी होती. मुले मोठी होत होती, पुढच्या वर्गात जात होती. बापाची धडपड मुलांना बघवत नसल्याने त्यांनीही लहानपणापासून ब्रेड विकून वडिलांचा थोडाफार शिक्षणाचा भार कमी करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या मुलाने बारावीनंतर शिक्षणाची इच्छा असतानाही, वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकाचा खर्च कमी झाला. आणि घरातही थोडीफार मदत झाली. मात्र लहाना दुर्गेश अतिशय हुशार होता. सुळे शाळेत शिकणाऱ्या दुर्गेशने दहावीत ८० तर बारावीत ८९ टक्के घेतले. त्यामुळे भावाबरोबर वडिलांच्याही त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या. पोटाला तडे देऊ मात्र याला शिकवू, असा संकल्प दोघांनीही बांधला. आणि त्याच्यासाठी काय घ्यायचे ते कष्ट करण्याचा त्यांनी संकल्प केला. कितीही कष्ट केले तरी गरजेपेक्षा जास्त मिळत नव्हते. दुर्गेशचा एमबीबीएसचा नंबर लागला. फी भरायची होती २३ हजार मात्र जुळवाजुळव करून केवळ १६ हजार रुपये जमले होते. अशात दुर्गेशच्या एका मित्राच्या आईने उरलेले पैसे भरले. किरायाच्या घरात राहून गोपाल देशमुख यांनी एक प्लॉट घेतला होता. त्या प्लॉटवर कर्ज काढून, मोठ्या मुलाच्या मदतीने दुर्गेशचे शिक्षण पूर्ण केले. आता दुर्गेश यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मोठा मुलगा किशोरनेही आपले शिक्षण पूर्ण करून जिल्हा न्यायालयात तो क्लार्क म्हणून कार्यरत आहे. मधला प्रमोदही एका खाजगी कंपनीमध्ये कार्यरत आहे. तब्बल ४० वर्षे रिक्षा ओढणारा हा बाप, आता सुखाचे दिवस आल्यानंतरही स्वस्थ बसला नाही. आता रिक्षा ओढणे होत नाही, त्यामुळे सायकल पंक्चरचे दुकान चालवितो आहे.