शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 10:17 IST

चिखली मतदारसंघाकडे  संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यंदा येथे २४ उमेदवार रिंगणात असले तरी, सामना परंपरागत प्रतिस्पर्धी भाजप व काँग्रेसमध्येच आहे.

सुधीर चेके पाटील, चिखलीMaharashtra Vidhan Sabha election 2024: चिखली मतदारसंघात भाजप महायुतीच्या विद्यमान आमदार श्वेता महाले विरुद्ध काँग्रेस मविआचे राहुल बोंद्रे यांच्यात थेट लढत होत आहे. सुरवातीला इथली लढत तुल्यबळ वाटत होती; परंतु राहुल गांधींची सभा ऐनवेळी रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचल्याचे चित्र आहे. अंतिम टप्प्यात मात्र ही लढत एकांगी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

चिखली मतदारसंघाकडे  संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यंदा येथे २४ उमेदवार रिंगणात असले तरी, सामना परंपरागत प्रतिस्पर्धी भाजप व काँग्रेसमध्येच आहे. भाजप उमेदवार श्वेता महाले पाच वर्षांतील विकासकामांचा मुद्दा घेऊन मैदानात उतरल्या आहेत. 

बोंद्रेंनीही विकासाला प्राधान्य देण्याचे सांगत भयमुक्त वातावरण निर्मितीला प्राधान्य राहील, अशी भूमिका घेतली आहे; परंतु, बोंद्रेंच्या प्रचारासाठी आयोजित सभेला राहुल गांधी आले नाहीत, त्याचा फटका बोंद्रेंना बसल्याने तुल्यबळ वाटत असलेली लढत काहीशी एकांगी होते की काय, अशी स्थिती आहे. 

मतदारसंघातील कळीचे मुद्दे

- गेल्या काही वर्षांपासून प्रामुख्याने विकासाच्या मुद्द्यांवरून निवडणूक लढविली जाते. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर येथे टीका करण्यास काँग्रेस उमेदवाराला तितकासा वाव नाही.

- चिखली शहराच्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नासोबतच पाणीप्रश्न सोडविण्यासाठी १३२ काेटी रुपयांचा निधी आणत कायमस्वरुपी उपाययोजना महालेंनी केल्या आहेत.

- सिंचनासह शेतकऱ्यांचे अन्य प्रश्नही कळीचा मुद्दा आहे. नदीजोड प्रकल्पाद्वारे पैनगंगेपर्यंत पाणी आणण्याचा मुद्दाही अग्रभागी आहे. सौरऊर्जेचा मुद्दाही गाजत आहे. सध्या दडपशाहीच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यावर मतदाराचा कौल काय राहील हे तूर्तास सांगता येत नाही. रोजगार, औद्योगिक विकास हे मुद्देही चर्चेत आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chikhli-acचिखलीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी