शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
4
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
5
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
6
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
7
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
8
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
9
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
10
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
11
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
12
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
13
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
14
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
15
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
16
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
17
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
18
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
19
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
20
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला कोकणात टक्केवारीचे ग्रहण; त्रस्त ठेकेदाराने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 1:56 AM

थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

नारायण जाधव 

ठाणे : ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत आणि विस्तारित होऊन ग्रामविकासाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला कोकणातील ठाणे, रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना टक्केवारीचे ग्रहण लागल्याच्या तक्रारींत वाढ होऊ लागली आहे. अशाच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात टक्केवारीच्या नादापायी अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून एका ठेकेदाराने कोकणात चाललेल्या टक्केवारीचा भंडाफोड करून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर न्यायालयात जाण्याचाही इशारा दिल्याची प्रतच लोकमतच्या हाती लागली आहे.

रायगड जिल्ह्यातील रोहा, तळासह रत्नागिरी जिल्ह्यात त्याच्यावर अन्यायाचा पाढा वाचून टक्केवारी दिली नाही, तर अधिकारी प्रामाणिक ठेकेदारांचा कसा छळ करतात, त्याच्या कामात नको त्या उणिवा काढून अशाप्रकारे नियमबाह्य दंडात्मक कारवाई करतात, कामचुकार ठेकेदारांना अशा प्रकारे पाठीशी घालतात, याचा सविस्तर तपशीलच संबंधित अधिकाऱ्यांच्या नावानिशी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केल्याचे लोकमतच्या हाती लागलेल्या पत्रांवरून दिसत आहे. विशेष म्हणजे काही रस्त्यांच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न करून स्थानिकांनी केलेल्या तक्रारींना अलिबाग येथील महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेने पेणच्या धरमतर खाडीत बुडविले आहे.

‘गोसावी’ बनून टक्केवारीचा ‘आनंद’ लुटणारे अधिकारीकोकणात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अशा प्र्रकारे नको ती कामे काढून, निवडक ठेकेदारांकरवी निकृष्ट दर्जाची कामे करून कोट्यवधी बिले काढून सरकारची कशा प्रकारे लूट चालविली आहे, याचा पाढाच या ठेकेदाराने वाचला. या काळ्या धंद्यामागे अलिबाग येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागात असलेले काही ‘गोरे’ अधिकारी काळे धंदे करून ‘गोसावी’ बनून कशा प्रकारे टक्केवारीचा ’आनंद’ लुटत आहेत, याचा त्यांच्या नावानिशी लेखाजोखाच मांडला आहे. एवढेच नव्हे, आपल्याला केलेल्या कामाचे पैसे मिळावेत, काम केले नसेल तर त्याची खुशाल चौकशी करा, असेही मयूरी कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदाराने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम भवनातील अनेक ‘प्रवीण’ अधिकारी सहभागीकोकणातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात अनागोंदी करून भ्रष्टाचार करणाºया अलिबाग कार्यालयातील अनेक अधिकारी, कर्मचाºयांना मंत्रालयासह सार्वजनिक बांधकाम भवनात ‘नागर’ टाकून बसलेले अन् टक्केवारी ‘मोज’ण्यात स्वत:ला ‘किडे’ समजणारे अनेक ‘प्रवीण’ अधिकारी वर्षानुवर्षे ठाण मांडून असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे