शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मुख्यमंत्र्यांचं 'मिशन पुणे', कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा अन् विरोधकांना देणार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 2:12 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत.

ठळक मुद्देबैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. 

मुंबई : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्याचा दौरा करणार आहेत. यावेळी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः  उत्तर देणार आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात कोरोना संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली जाईल. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री फक्त मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली, याबद्दल पाठ थोपवून घेत आहेत अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. इतकेच नाही तर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार कोरोना परिस्थिती हाताळण्यात पुण्यामध्ये अपयशी ठरले हे दाखवण्याचा तर मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न नाही ना, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

याचबरोबर, राज्य सरकार पुण्यावर अन्याय करत असल्याची टीका भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीत केली होती. राज्यातील सरकार मुंबईकडे जितके लक्ष देते तितके पुण्याकडे देत नाही. पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्वारंटाईन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. मात्र, पुणे, पिंपरी पालिकेला एकाही नव्या पैशाचे अनुदान राज्य सरकारने दिलेले नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा उद्याचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री विरोधकांना उत्तर देणार का, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. 

आणखी बातम्या...

'आता तरी किंमत सांगा...', राफेलवरून दिग्विजय सिंहांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

रियाने सुशांतच्या अकाऊंटमधून एका महिन्यात १५ कोटी काढले, वडिलांचा गंभीर आरोप    

लडाखच्या पँगोंग-गोगरामध्ये अद्याप चीनची माघार नाही, फिंगर भागातही परिस्थिती जैसे थे...    

"१५ दिवसांत ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील", मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ       

राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका

कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार    

अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा     

राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा