शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, आसमानी संकटाची प्रत्यक्ष पाहणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 19:48 IST

Uddhav Thackeray : आसमानी संकटांमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देयेत्या सोमवारी (दि.१९) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुंबई : राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आसमानी संकटांमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना भेटण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१९) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा असा असेल दौरा...- सकाळी 09:00 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण- सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे), - सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा - सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, - सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण, - सकाळी 11:30 वा.    अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, - सकाळी 11:45वा.    अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,- दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी- दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,- दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी, - दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,- दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, नंतर  सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणारनुकसानग्रस्त शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे येत्या १९ ऑक्टोबरपासून ३ दिवसांचा दौरा करणार आहेत. देवेंद्र फणडवीस आपल्या दौऱ्याची सुरुवात बारामतीपासून करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी २० ऑक्टोबरला उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी २१ ऑक्टोबरला रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत.

शरद पवार उद्यापासून दौऱ्यावरयाचबरोबर, या आसमानी संकटांमुळे शेतकरी पुरता हवालदिल हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. शरद पवार हे उद्यापासून दोन दिवसांचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा, उस्मानाबाद भागाची पाहणी करणार आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSolapurसोलापूरFarmerशेतकरी