शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यवतमाळातून निवडणूक लढण्याची ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 18:22 IST

विधान परिषद अथवा विधानसभा निवडणूक लढण्याची ऑफर शिवसेना नेते, माजी महसूल राज्यमंत्री आमदार संजय राठोड यांनी शुक्रवारी दिली आहे.

यवतमाळ : राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यवतमाळ जिल्ह्यातून विधान परिषद अथवा विधानसभा निवडणूक लढण्याची ऑफर शिवसेना नेते, माजी महसूल राज्यमंत्री आमदार संजय राठोड यांनी शुक्रवारी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. पुढील सहा महिन्यात त्यांना हे सदस्यत्व मिळविणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध चालविला जात आहे. ते विधान परिषदेतून जाणार की  विधानसभेतून हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु त्यांच्यासाठी दोन्ही पर्यायांचा विचार केला जात आहे.विधान परिषदेचा यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. प्रा. तानाजी सावंत येथून निवडून आले होते. परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रा. सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भुमपरांडा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे. त्यामुळे यवतमाळची ही जागा रिक्त झाली असून, आणखी तीन वर्ष शिल्लक आहेत. या जागेसाठी आतापर्यंत प्रा. तानाजी यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी सावंत यांच्या नावाची चर्चा होती. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच यवतमाळसाठी त्यांचे नाव चर्चेत आले आहे.उद्धव ठाकरे यांनी यवतमाळातून विधान परिषद किंवा सेनेसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणा-या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी ऑफर दिग्रसचे आमदार संजय राठोड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंना प्रत्यक्ष भेटून दिली. उद्धव ठाकरे यांनी विदर्भातून आणि त्यातही सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून निवडणूक लढवावी अशी विनंती त्यांना केली गेली. राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळताना उद्धव ठाकरेंनी शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करावे याकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. विशेष असे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही दिग्रस विधानसभा मतदारसंघातून लढण्याची ऑफर संजय राठोड दिली होती. ------------मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज प्रत्यक्ष भेटून यवतमाळ जिल्ह्यातून विधान परिषद अथवा विधानसभा निवडणूक लढण्याची ऑफर दिली. त्यांनी माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. या ऑफरचा ते निश्चितच विचार करतील, अशी अपेक्षा आहे. - संजय राठोडआमदार, दिग्रस

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस