शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी; न्यायालयाचे ताशेरे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 1:20 AM

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात गृहखात्याने दाखवलेल्या दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर गंभीर ताशेरे ओढल्याने राज्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे.

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात गृहखात्याने दाखवलेल्या दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर गंभीर ताशेरे ओढल्याने राज्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री हे पूर्णपणे अपयशी व कार्यक्षम ठरले आहेत. फडणवीस हे संविधानाप्रमाणे नाही तर संघाच्या विचारधारेनुसार काम करत आहेत. संघ विचारधारा ही कायम संविधान विरोधी राहिलेली आहे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हे कायम संघ विचारधारेच्या विरोधात लढले. त्यामुळेच त्यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यात सरकारला रस नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी तपासाचे धागेदारे संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या बड्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पंतप्रधानांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक तपास मंद करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला दिले, असा आरोप इंडिया स्कूप नावाच्या वेबसाईटने केला आहे. यासंदर्भात काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरणही मागितले होते; मात्र त्यांनी आजवर ते दिले नाही, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र