शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

...म्हणून नगरमध्ये शिवसेनेऐवजी भाजपाचा महापौर झाला; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 14:59 IST

नगरमध्ये भाजपा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असतानाही तिथे भाजपाचाच महापौर कसा जिंकला, याची आतली गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर सांगितली.

ठळक मुद्देत्रिशंकू निकाल लागलेल्या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये 24 जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरलामात्र 14 जागांसह तिसऱ्या स्थानी असलेल्या भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर महापौर आणि उपमहापौरपद पटकावले नगरमध्ये शिवसेनेला बिनशर्त पाठिंब्यापाठिंबा देण्यासाठी भाजपा तयार होता. पण पाठिंब्यासाठीचा प्रस्तावही शिवसेनेकडून आला नाही

मुंबई - त्रिशंकू निकाल लागलेल्या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये 24 जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र असे असूनही 14 जागांसह तिसऱ्या स्थानी असलेल्या भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर महापौर आणि उपमहापौरपद पटकावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे राज्यातील राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले होते. तसेच भाजपा आणि शिवसेना यांच्यातील तणावही वाढला आहे.  दरम्यान, नगरमध्ये भाजपा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असतानाही तिथे भाजपाचाच महापौर कसा जिंकला, याची आतली गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर सांगितली.फडणवीस म्हणाले की, '' नगरमध्ये शिवसेनेला बिनशर्त पाठिंब्यापाठिंबा देण्यासाठी भाजपा तयार होता. स्थानिक पातळीवर बोलणी सुरू होती.  मीसुद्धा सेनेकडूना ची मागणी झाल्यास पाठिंबा द्या, असे सुचवले.  मात्र महापौर निवडीच्या तीन दिवस आधीपर्यंत शिवसेनेतून कुणीही आमच्याशी बोलण्यास तयार नव्हते. मात्र पाठिंब्यासाठीचा प्रस्तावही शिवसेनेकडून आला नाही. उलट आम्हीच शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांशी बोलावे. रामदास कदमांना आम्ही पाठिंबा देतोय म्हणून सांगा, अशी गळ घालण्यात आली. मात्र पाठिंब्यासाठी शिवसेनेने  प्रस्ताव दिला पाहिजे, असे महाजन यांनी सांगितले. अखेरपर्यंत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार होतो. अखेरीस शेवटच्या दिवशी महापौर निवडीसंदर्भातील सर्वाधिकार आम्ही स्थानिक नेतृत्वाला दिले.'' ''सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगरमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला नव्हता. तिथे आम्ही महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार दिले होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे पाठिंबा का दिला हे राष्ट्रवादी काँग्रेसलाच विचारा,'' असे सांगत नगरमध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबतचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी टोलवला. तसेच नगरमध्ये राष्ट्रवादी पाठिंबा दिला असला तरी पुढे असे काही होणार नाही. भाजपा पुढची निवडणूक 100 टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधातच लढणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAhmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना