शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

बुलढाण्यातील 'अग्निवीर' अक्षयला वीरमरण; राज्य शासनातर्फे मदत जाहीर, CM शिंदेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 12:25 PM

भारतमातेचे रक्षण करताना बुलढाण्याचे सुपुत्र अग्निवीर अक्षय गवते यांना वीरमरण आले.

भारतमातेचे रक्षण करताना बुलढाण्याचे सुपुत्र अग्निवीर अक्षय गवते यांना वीरमरण आले. मागील वर्षी वादग्रस्त ठरलेल्या अग्नीवीर योजनेद्वारे अनेक तरूण सैन्यात भरती झाले. यातील एका अग्निवीर जवानाला देशाचे रक्षण करताना हौतात्म्य आले. लडाखच्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेले अग्निवीर (ऑपरेटर) अक्षय लक्ष्मण गवते यांना हौतात्म्य आले. विशेष बाब म्हणजे ऑनड्युटी शहीद झालेले अक्षय पहिले अग्निवीर आहेत. अक्षय यांना वीरमरण आल्यानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारतमातेच्या सुपुत्राला सलाम ठोकला. अशातच राज्य सरकारने बुलढाण्यातील सुपुत्राच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. 

राज्य सरकारने अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवरून याबाबत माहिती दिली. CMO ने एक पोस्ट करत म्हटले, "सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जवान अक्षय गवते हे चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई  येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली."

  दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपगळगाव सराईचे रहिवासी अक्षय गवते (२३) यांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय लष्कराने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली. तसेच, या दुःखाच्या प्रसंगी आम्ही गवते कुटुंबासोबत खंबीरपणे उभे असल्याचेही सांगितले. दरम्यान, अक्षय यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती आहे. सियाचीनच्या दुर्गम उंचीवर कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण यांना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि भारतीय लष्कराच्या सर्व स्तरातील अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. जवान अक्षय, कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यांचे आईवडील शेती करतात. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEknath Shindeएकनाथ शिंदेIndian Armyभारतीय जवानAgneepath Schemeअग्निपथ योजना