Chief Minister Devendra Fadnavis will hold a press conference within the hour | महाराष्ट्र निवडणूक 2019 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साडेचार वाजता पत्रकार परिषद घेणार; 'गोड बातमी' देणार?
महाराष्ट्र निवडणूक 2019 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साडेचार वाजता पत्रकार परिषद घेणार; 'गोड बातमी' देणार?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार संपुष्टात येण्यासाठी 20 तास उरलेले असताना आज सायंकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. दरम्यान, वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला असून चंद्रकांत पाटील, फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रंगशारदामध्ये आमदारांची भेट घेणार असल्याचे सुनिल प्रभू यांनी सांगितले.


युतीला बहुमत मिळालेले असताना शिवसेनेने 50-50 टक्के सत्तेत हिस्सा मागितल्याने निकाल लागून 15 दिवस उलटत आले तरीही सत्ता स्थापनेत भाजपाला अपयश आले आहे. यामुळे आजचा दिवस महत्वाचा मानला जात आहे. 


भाजपाचे नेते आणि मंत्री आशिष शेलार राजभवनामध्ये पोहेचले असून भाजपाचे अन्य नेतेही तेथे जाण्याची शक्यता आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजीनामा देण्याची चर्चा आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वर्षा बंगल्यावर आज साडेचार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. 


राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे. विधानसभा बरखास्त होत असताना राज्यातील सरकारचा कार्यकाळही संपुष्टात येतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभा बरखास्त झाल्यानंतर राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरु करतील. सर्वात आधी ते सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तेचं निमंत्रण देऊ शकतात. भाजपाकडे १०५ आमदारांचे संख्याबळ आहे तर शिवसेनेकडे ५६ आमदारांचे संख्याबळ आहे. या दोन्ही पक्षांनी निवडणुका एकत्र लढल्या होत्या. महायुतीकडे बहुमताचा १४५ आकडा आहे. पण मुख्यमंत्रिपद समसमान वाटप व्हावं या मागणीवर शिवसेना ठाम आहे तर मुख्यमंत्रिपद सोडणार नसल्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळे राज्यात अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. 


...तर शिवसेनेने केंद्रातील सत्तेतून बाहेर पडावे
दरम्यान, सरकार स्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेनेने आधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडावे, म्हणजे ते भाजपशिवाय अन्य पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवण्यासाठी गंभीर आहेत हे लक्षात येईल. तसे झाले तरच आम्ही दिल्लीत श्रेष्ठींशी बोलू असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. गेले १३ दिवस निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतर काँग्रेसची ही पहिली भूमिका समोर आली आहे.
 

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis will hold a press conference within the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.