शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'त्या' महिला कॉन्स्टेबलला लिंगपरिवर्तनासाठी मुख्यमंत्र्याची परवानगी, सेवेत रुजू करुन घेण्याचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 5:25 PM

 बीड जिल्हा पोलीस दलातील एका 27 वर्षीय महिला पोलीस कर्मचा-याने लिंग बदल करुन पुन्हा सेवेत रुजू करण्याची मागणी केल्याने राज्यात खळबळ उडाली होती.

बीड : बीड जिल्हा पोलीस दलातील एका 27 वर्षीय महिला पोलीस कर्मचा-याने लिंग बदल करुन पुन्हा सेवेत रुजू करण्याची मागणी केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. पोलीस महासंचालकांनी लिंगबदलाची परवानगी नाकारल्यानंतर संबंधित महिलेने उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. दरम्यान, या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आहे. या प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक आणि गृह विभागाला दिल्या आहेत. दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याने नियमात तरतूद करुन सेवेत रुजू करुन घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या पोलीस दलातील महिलेने बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे एका अर्जाद्वारे लिंग बदलण्यासाठी परवानगी मागितली होती. असे प्रकरण पहिल्यांदाच असल्याने श्रीधर यांनी हा अर्ज पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला.  त्यांच्याकडूनही याबाबत निर्णय न झाल्याने प्रकरण पोलीस महासंचालकांकडे गेले. दोन दिवस विचारविनिमय झाला. शनिवारी रात्री परवानगी नाकारल्याचे पत्र बीड पोलीस अधीक्षकांना महासंचालक यांच्याकडून मिळाले. त्यानंतर आज या महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुरुष होण्याचे स्वप्न अर्धवट-मागील अनेक वर्षांपासून ही महिला पोलीस पुरुषांसारखी राहत होती. तिचे हावभाव, भावनाही पुरुषांसारखे आहेत. तसेच तिला स्वत:लाही आपण स्त्री नसून, पुरुषच असल्याचे जाणवत होते. त्यामुळे तिने अधीक्षकांकडे धाव घेऊन लिंग बदल करुन पुरुष होण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु महासंचालकांनी हा अर्ज फेटाळून लावल्याने तूर्त तरी तिचे पुरुष होण्याची स्वप्न अर्धवटच राहिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिसSex Changeलिंगपरिवर्तन