मुख्यमंत्र्यांनी कामात कसूर केल्याचा आरोप; काँग्रेसकडून मुख्य सचिवांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 02:28 AM2019-08-06T02:28:42+5:302019-08-06T06:47:30+5:30

राष्ट्रीय आपदा प्रतिबंधक कायदा - २००५ च्या कलम ६० (बी) प्रमाणे नोटीस

Chief Minister accused of misconduct at work; Notice from Congress to Chief Secretary | मुख्यमंत्र्यांनी कामात कसूर केल्याचा आरोप; काँग्रेसकडून मुख्य सचिवांना नोटीस

मुख्यमंत्र्यांनी कामात कसूर केल्याचा आरोप; काँग्रेसकडून मुख्य सचिवांना नोटीस

Next

मुंबई : जनता मुसळधार पावसात अडकलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदत पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख हे ‘महाजनादेश’ यात्रेतून मतदानाची भीक मागत फिरत आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नाना पटोले यांनी राष्ट्रीय आपदा प्रतिबंधक कायदा - २००५ च्या कलम ६० (बी) प्रमाणे मुख्य सचिव अजय मेहता यांना भेटून नोटीस दिली आहे.

राज्याला नैसर्गिक आपत्तीच्या संकटात वाऱ्यावर सोडल्याबद्दल तसेच कर्तव्यात कसूर केल्याची जबाबदारी निश्चित करून मुख्यमंत्री फडणीस आणि पुनर्वसन मंत्री देशमुख यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे नोटीशीत म्हटले आहे. नोटिसीच्या ३० दिवसांत मुख्य सचिवांनी योग्य कार्यवाही न केल्यास मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी यांच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात जाऊ असे पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पंचतारांकित प्रचार यात्रा
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पनवेल, संपूर्ण कोकण, नाशिक, पुणे, बदलापूर, कल्याण, सांगली, कोल्हापूर अशा प्रमुख शहरांमध्ये संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा बिकट परिस्थितीत मुख्यमंत्री आणि राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे शासकीय खर्चाने पंचतारांकित प्रचार यात्रा करत फिरत आहेत असा आरोप ही पटोले यांनी केला आहे.

Web Title: Chief Minister accused of misconduct at work; Notice from Congress to Chief Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.