शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
'मिआ बाय तनिष्क'च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
4
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
6
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
7
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
8
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
9
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
10
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
11
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
12
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
13
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
14
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
15
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
16
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले
17
हॉटेलचा बेड पाहूनच ग्राहकाची झोप उडाली! असं काय पाहिलं की, मालकाला १ लाखांचा दंड द्यावा लागला? 
18
Diwali Special Recipe: गॅसचा वापर न करता, घरच्या साहित्यात करा हलवाईसारखी रुचकर मिठाई
19
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
20
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 14:19 IST

आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवविचार आहे.

ठळक मुद्देशिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरा

जुन्नर : गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबध्द राहील, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.   सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद,  भगव्या पताका, 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.  कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे,खा. डॉ.अमोल कोल्हे, आ. अतुल बेनके  यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवविचार आहे. जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे तेज,प्रेरणा पाठीशी राहू द्या, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.    .उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली.या दिशेने सरकारचे काम चालू आहे. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदी अभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता घेतली जात आहे. परिसरातील विकास कामांसाठी तातडीने23 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्यावेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या गुन्ह्यात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, ते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.   प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उप मुख्य मंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सहअसंख्य शिवभक्त उपस्थित होते.

टॅग्स :Junnarजुन्नरUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारShivjayantiशिवजयंतीState Governmentराज्य सरकार