शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ-शहांचे हितसंबंध उघड

By admin | Updated: June 9, 2015 02:06 IST

मुंबईतील कलिना भागातील जमीन बिल्डरांच्या घशात घातल्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळ व तत्कालीन बांधकाम सचिव एम. एच. शहा यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

सुधीर लंके, पुणे मुंबईतील कलिना भागातील जमीन बिल्डरांच्या घशात घातल्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळ व तत्कालीन बांधकाम सचिव एम. एच. शहा यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे भुजबळ यांच्या शिफारशीवरून शहा यांनी राज्याचे माहिती आयुक्तपद भूषविले. या नियुक्तीतील हितसंबंधही यानिमित्ताने एकप्रकारे उघड झाले असून, माहिती आयुक्तपदी प्रामाणिक अधिकारी असतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाच्या सचिव पदावरून निवृत्त होताच शहा यांची नाशिक विभागाच्या माहिती आयुक्तपदी निवड झाली होती. पुढे त्यांनी या पदावर कोकण व पुणे विभागातही काम केले. शहा यांनी त्यावेळी भुजबळांचे शिफारसपत्र जोडून या पदासाठी अर्ज सादर केला होता. ‘मी शहा यांना ओळखतो व ते गुणवान अधिकारी आहेत. त्यांची माहिती आयुक्त पदावर नियुक्ती करावी,’ अशी शिफारस भुजबळांनी त्या वेळी दिली होती. आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत त्या वेळी भुजबळही सदस्य होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे देखील समितीत होते. दाखल झालेला गुन्हालाचलुचपत प्रतिबंधक कायदा - १३ (१), (क) - सरकारी नोकराचे गुन्हेगारी गैरवर्तन, स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करणे किंवा दुसऱ्याला असा गैरवापर करण्यास परवानगी देणे, १३ (१),(ड) - सरकारी नोकर असताना उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असणे, भादंवि - ४२० - फसवणूक, ४६५ - बनावट कागदपत्रे बनविणे, दोन वर्षांची शिक्षा व दंड अथवा दोन्ही, अजामीनपात्र, ४६८- फसवणुकीच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे बनविणे - ७ वर्षांपर्यंत शिक्षा, अजामीनपात्र, ४७१ - बनावट कागदपत्रांचा वैध असल्याप्रमाणे वापर करणे. ४७४- बनावट कागदपत्रांचा मृत्युपत्र अथवा मालमत्तेसाठी वापर करणे आणि न्यायालयीन व निबंधक कार्यालयातील कागदपत्रे बनावट तयार करणे, यासाठी सात वर्षांची शिक्षा, ४७७ (अ) - बनावट नोंदी करणे, ७ वर्षांची शिक्षा, १२० (ब) सह ३४- कटकारस्थान