शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

Maharashtra Budget: "पळीभर पंचामृत तीर्थ म्हणून देतात तसाच हा अर्थसंकल्प म्हणजे..."; छगन भुजबळांची सरकारवर खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 21:28 IST

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी

Chhagan Bhujbal, Maharashtra Budget 2023: राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडून सर्वांना खूश करत आकड्यांचा खेळ करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यातुन राज्यकर्ते म्हणुन सरकारच्या झोळीत काहीतरी पडेन पण राज्याच्या जनतेच्या झोळीत काहीच पडणार नाही. अर्थसंकल्पाचे वर्णन ‘पंचामृत’ असे केले. पूजा झाल्यावर श्रद्धावान मंडळी प्रसादाच्या जोडीला पळीभर पंचामृत तीर्थ म्हणून देतात. त्याने पोट भरत नाही. तसाच हा अर्थसंकल्प म्हणजे सर्व घटकांना सामावून घेण्याचा फक्तच प्रयत्न होतोय, मात्र त्याने राज्याचे पोट भरणार नाही, अशी टीका करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली ३०० रुपये आर्थिक मदत ही अतिशय तुटपुंजी असून शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान देण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडून अर्थ संकल्पावरील चर्चेवर बोलताना सभागृहात व्यक्त केली.

अर्थ संकल्पावरील चर्चेवर ते म्हणाले की, अर्थसंकल्पामध्ये महसुली जमेत अधिक वाढ दाखविण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात जमीन महसुलाचा २०२२-२३ सुधारित अंदाज ३ हजार कोटी असताना अर्थसंकल्पीय अंदाज मात्र ४ हजार ५०० कोटी दाखविण्यात आला. अचानक १ हजार ५०० कोटींची वाढ कशी झाली.राज्य वस्तू व सेवाकर २०२२-२३ सुधारित अंदाज १,२५,४११ कोटी असताना अर्थसंकल्पात मात्र १,३६,०४१ कोटी अचानक ११ हजार कोटीची वाढ कशी झाली. व्याज्याच्या जमा रक्कमा २०२२-२३ सुधारित अंदाज १४०० कोटी असताना आता अचानक ३ हजार कोटी कसे झाले. सीमा शुल्क १५९४ कोटी असताना अचानक २०४६ कोटी कसे झाले असे सवाल उपस्थित करतविकासावर करण्यात येणारा खर्च हा महागाईच्या दरानुसार दिवसागणीक वाढत जातो. तुमचा मात्र खर्च हा कमी झाल्याचा दिसतो अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, महागाई दर ७ टक्के आहे. तरी देखील Fiscal Defecate  कमी दाखविण्यासाठी खर्च कमी दाखविण्यात आला. खर्चाचे आकडे कमी दाखविले आणि जमेचे आकडे फुगविले गेले असा घणाघात त्यांनी केला. आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचा २०२२-२३ चा सुधारित अंदाज हा २२४४९ कोटी एवढा असताना यावर्षी मात्र मक्त २१८४७ कोटी खर्च केला जात आहे. आरोग्यावर खर्च वाढवण्याऐवजी तो कमी का केला ?  राज्य सरकार आपला दवाखाना कोणत्या पैशातून सुरु करणार जाहिरातींवरचा म्हणजेच माहिती व प्रसारण विभागाचा खर्च मात्र तुम्ही  वाढविला २०२२-२३ मध्ये २८० कोटी असताना आता मात्र ६०० कोटी केला असा सवाल उपस्थित करत आकडेवारीचा निव्वळ खेळ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChhagan Bhujbalछगन भुजबळFarmerशेतकरीonionकांदा