शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 17:26 IST

छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी समज द्यावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे.

Chhagan Bhujbal ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे मागील काही दिवसांपासून महायुतीविरोधातच भूमिका घेत असल्याचं दिसत आहे. विधानसभेचं जागावाटप, ४०० पारचा नारा, मनुस्मृतीबाबतचा वाद अशा विविध मुद्द्यांवरून त्यांनी आपली आक्रमक भूमिका जाहीरपणे मांडली आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी समज द्यावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. या मागणीचा आज भुजबळ यांना खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.

"काय समज द्या, समज द्या, असं लावलंय. मी माझ्या पक्षात बोलणारच. मी जागावाटपाचा मुद्दा माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडला होता. पण त्याचेही लोकांना वाईट वाटले. मी असं कसं बोलू शकतो, अशी ओरड त्यांनी केली. त्यामुळे मी आता मीडियासमोर बोलणार नाही. मात्र मला जे काही सांगायचं असतं, ते मी पक्षाला सांगेन. आम्ही महायुतीमध्ये येताना भाजप नेते काय बोलले होते, त्याची आठवण फक्त मी त्यांना करुन दिली," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे. मनुस्मृतीबाबतच्या भूमिकेवर कायम, भाजपला काय उत्तर दिलं?

मनुस्मृतीतील काही श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणं, हा मनुस्मृतीचा चंचूप्रवेश करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत आम्ही याला विरोध करणारच, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. "दरेकर काय म्हणाले हा त्यांचा प्रश्न आहे, आव्हाडांना विरोधासाठी विरोध करु नका.  मुख्य मुद्दा मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात प्रवेश होता कामा नये हा आहे, त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा. पहिल्यांदा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती नको हे सांगा, नंतर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करा," अशा शब्दांत भुजबळ यांनी भाजप नेत्यांना ठणकावलं आहे.

दरम्यान, "आधी ती मनुस्मृती जाळा जी बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली होती.फक्त विरोधासाठी विरोध नाही, आमची जी आयडीयालॉजी आहे फुले, शाहू, आंबेडकरांची मनुस्मृतीच्या विरोधात उभं राहणं, त्याच्यासाठी जो, जो उभा राहिलं त्यांच्या हातून जर चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक. मुंबईतून ते चवदार तळ्यावर गेले होते त्यांच्याहातून चुकून झालं, त्याच्यामागे मनुस्मृती जाळणे ही भावना होती, आता त्यांना शिक्षा काय करायची ती करा माझं काही म्हणणे नाही. तो अधिकार तुम्हाला तुम्ही स्वत: ज्यावेळी मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल तेव्हा येतो.ज्यावेळी तुम्ही स्वत: मनुस्मृती जाळाल तेव्हा तुम्हाला तो अधिकार येईल, असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४