वसई-विरारमधील फॅक्टरींची तपासणी
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:06+5:302016-06-07T07:43:06+5:30
डोंबीवली येथील रासायनिक कारखानत स्फोट होवून मोठ्या प्रमाणात हानी झाल्याच्या पार्श्वभुमीवर वसई-विरार महापालिकेने आता सतर्कतेची भुमिका घेतली

वसई-विरारमधील फॅक्टरींची तपासणी
विरार: डोंबीवली येथील रासायनिक कारखानत स्फोट होवून मोठ्या प्रमाणात हानी झाल्याच्या पार्श्वभुमीवर वसई-विरार महापालिकेने आता सतर्कतेची भुमिका घेतली असून,पालिकेमार्फत आपल्या हद्दीतील सर्वच कारखान्यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.
डोंबीवली प्रमाणेच वसई तालुक्यात लहान मोठ्या अशा हजारो कंपन्या आहेत.वसईच पुर्वेकडील नवघर,सातीवली, वालीव,गोखिवरे,नवजीवन,कामण तर विरारला चंदनसार,बेगर्स होम,नारिंगी परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत.या कंपन्याची अग्निशमन विभागामार्फत तपासणी महापालिकेने सुरु केली आहे. ही तपासणी करतानाच आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाोजना करण्याच तसेच घातक रसानांचा साठा करण्यात येऊ नये अशा सुचना कंपन्यांना दिल्या जात आहेत.कंपन्यांनी अतिरिक्त बांधकाम केलेले आढळल्यास त्यांना ते निष्काशीत करण्याच्या नोटीसा बजावण्यात येत असून, सदर कंपनंची मुदतीत निष्काषीत न केलस बांधकाम स्वत: पाडून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करणत येईल. असेही या नोटीसीत बजावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
>तर एमआरटीपीच्या नोटिसाही बजाविणार
वाढीव अथवा अनधिकृत बांधकाम आढळल्यास संबंधितांस एम.आर.टी.पीच नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.तसेच वाढीव बांधकाम आढळल्यास त्याची माहिती देण्याचे नागरिकांना आवाहनही करण्यात आले आहेत.औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यां मध्ये आग लागून दुर्घटना घडण्याचे प्रकार वारंवार होत असलमुळे ही सतर्कता बाळगण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच जनसंपर्क कक्षातून देण्यात आली.