दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या वाहतुकीत बदल

By Admin | Updated: May 14, 2014 01:04 IST2014-05-13T20:18:32+5:302014-05-14T01:04:46+5:30

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईची मतमोजणी ज्या भागात होणार आहे.

Changes in traffic of South Mumbai and South Central Mumbai | दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या वाहतुकीत बदल

दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या वाहतुकीत बदल

मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईची मतमोजणी ज्या भागात होणार आहे. त्या भागातील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतुक पोलिसांनी घेतला आहे
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी जहांगिर आर्ट गॅलरीसमोरील एलफिस्टन कॉलेजमध्ये होणार आहे. या मतमोजणीच्या दिवशी मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे विविध खासगी वाहनेही या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आणली जातील. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी मार्ग, के.दुभाष मार्ग, अे.डिमेलो मार्ग आणि कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग इत्यादी मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. हे पाहता या भागातील हुतात्मा चौक पासून ते एस.पी.मुखर्जी चौक आणि डॉ.एस.पी.मुखर्जी चौक पासून ते काळा घोडा जक्शनपर्यंत, लायन गेट जक्शनपासून ते एम.जी.रोड जक्शनपर्यंत आणि काळा घोडा जक्शनपासून ते शहीद भगतसिंग मार्ग लायन गेट जक्शनपर्यंत, अे.डिमेलो मार्गावर काळा घोडा जक्शनपासून ते कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग श्रीमती प्रेमलाताई चव्हाण चौकपर्यंत, कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग दोन्ही वाहिनीवरील श्रीमती प्रेमलाताई चव्हाण चौकपासून ते मादाम कामा रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकपर्यंत, विद्यापिठ पथ डॉ.जी.एस.घुर्ये चौकापासून ते महात्मा गांधी रोडपर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी माहीम येथील रुपारेल महाविद्यालयात होणार आहे. या पार्श्वभूमीवर एन.सी.केळकर रोड, जे.के.सावंत रोड, बाळ गोविंददास रोड, सेनापती बापट मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग, लेडी जमशेदजी रोड इत्यादी मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची वाहने वगळून काही वाहनांना या मार्गावर निषिध्द करण्यात आले आहे.

Web Title: Changes in traffic of South Mumbai and South Central Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.