शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
3
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
4
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
5
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
6
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
7
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
8
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
9
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
10
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
11
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
12
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
13
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
14
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
15
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
16
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
17
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
18
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
19
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
20
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन

विद्यापीठ मान्यतेच्या नियमावलीत होणार बदल : डॉ. माणिकराव साळुंखे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 16:49 IST

देशातील पारंपरिक विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे,अभिमत व खासगी आदी विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याचे काम सुरू...

ठळक मुद्देस्वतंत्र जनरल प्रसिद्ध करणार एकविसाव्या शतकातील विद्यापीठांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागणार माहिती तंत्रज्ञानामुळे पुढील काळात अनेक अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविले जाणार

राहुल शिंदे - पुणे : देशातील विद्यापीठांना मान्यता देण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने (एआययू) घेतला आहे. लवकरच या नियमांची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे जगभरातील उच्च शिक्षण क्षेत्रातील घडामोडींचे आणि नावीन्यपूर्ण संशोधनांचे लेखन प्रसिद्ध करण्यासाठी एआययूतर्फे स्वतंत्र जनरल प्रसिद्ध करणार आहे, असे एआययूचे अध्यक्ष डॉ. माणिकराव साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.देशातील पारंपरिक विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे,अभिमत व खासगी आदी विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याचे काम एआययूतर्फे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. बांगलादेश, भूतान, रिपब्लिक ऑफ कझाकीस्तान, मलेशिया, नेपाळ, थायलंड आदी देशातील १३ विद्यापीठे एआययूचे सहयोगी सदस्य आहेत. देशाच्या उच्च शिक्षणाला दिशा देण्यात एआययूची भूमिका महत्त्वाची आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात आणि झपाट्याने बदलणाऱ्या एकविसाव्या शतकातील विद्यापीठांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागणार आहे. त्यामुळेच एआययूने विद्यापीठांना मान्यता देण्याच्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.माणिकराव साळुंखे म्हणाले, माहिती तंत्रज्ञानामुळे पुढील काळात अनेक अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठांसाठी शेकडो एकर जागेची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे एआययूकडून विद्यापीठ मान्यतेच्या नियमावलीत बदल केले जाणार आहेत. साळुंखे म्हणाले, परदेशातून पदवी प्राप्त करून भारतात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीची समकक्षता एआययूकडून तपासून दिली जाते. त्याचप्रमाणे परदेशातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भारतात येऊन शिक्षण घ्यावे. या उद्देशाने केंद्र शासनाच्या सुचनेनुसार एआययूतर्फे ‘स्टडी इंडिया’हा उपक्रम राबविला जात आहे. इंटरनॅशनल ऑल युनिव्हर्सिटी स्तरावर एकविसाव्या शतकात विद्यापीठे कशी असावी? याबाबत विचारमंथन सुरू आहे. त्याचप्रमाणे येत्या २३ मार्च रोजी ‘रिइमॅजिंग इंडियन युनिव्हर्सिटी’ या विषयावर देशपातळीवरील परिषद घेतली जाणार आहे. तसेच खेलो इंडिया अंतर्गत १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाºया विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांच्या आयोजनात एआययूला सहभागी करून घेतले आहे. येत्या मार्च महिन्यात या स्पर्धा भुवनेश्वर येथे होणार आहेत.शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींची व घडामोडींची माहिती माहिती व्हावी. या उद्देशाने एआययूतर्फे स्वतंत्र जर्नल प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यात प्रसिद्ध होणा लेखांची-शोधनिबंधांची गुणवत्ता तपासली जाईल, असे नमूद करून साळुंखे म्हणाले, एआययूचे संकेतस्थळावर जगभरातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे परदेशातील विद्यापीठांचे भारतातील विद्यापीठांशी करार करण्याचे काम सोपे होणार आहे. ..........कार्यपद्धतीत काही बदल करता येणार

एआयूममध्ये चार संशोधक विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यांना विविध संशोधन प्रकल्पांवर काम करावे लागेल. भारतात परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केल्यास काय होईल, आदी विषयावर हे विद्यार्थी काम करतील. त्यानुसार एआययूला आपल्या कार्यपद्धतीत काही बदल करता येतील, असेही माणिकराव साळुंखे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठEducationशिक्षण