शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष शिगेला, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:36 IST

Chandrapur Municipal Corporation Election Result: चंद्रपूर महानरपालिकेमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तसेच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. 

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत विदर्भातील चंद्रपूरमध्ये काँग्रेसने दमदार कामगिरी करत राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाला धोबीपछाड दिला होता. ६६ सदस्यसंख्या असलेल्या चंद्रपूरच्या महानगरपालिकेत २७ नगरसेवकांसह काँग्रेस सर्वात मोोठा पक्ष ठरला होता. तसेच काँग्रेस आणि जनविकास सेना यांच्या आघाडीला मिळून एकूण ३० जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस पक्ष सत्तास्थापनेच्या जवळ पोहोचला आहे. मात्र काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी ४ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. पण सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तसेच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. एकीकडे भाजपाकडून चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी चाचपणी करून ऑपरेशन लोटस राबवण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे काँग्रेसची नागपूर  येथील नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी दोन गट करून काँग्रेस पक्षाचं विभाजन केल्याचा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला. त्या म्हणाल्या की, निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सर्वजण घरी असतानाच आमच्याच पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने नगरसेवक घरी असताना त्यांना उचलून नेलं. पक्षाचे नगरसेवक असे उचलून नेऊन त्यांचे वेगवेगळे गट करण्याची गरज नव्हती. पण इथे चुकीची पद्धत अवलंबली गेली आणि त्यामधून काँग्रेसचं दोन गटांमध्ये विभाजन झालं, असा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला. तसेच जर सोईसाठी नगरसेवकांना न्यायचं होतं, तर सर्वांनाच एकत्र घेऊन जायला पाहिजे होतं, असेही प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

धानोरकर यांच्या या टीकेनंतर विजय वडेट्टीवार यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मी कुठल्याही नगरसेवकाला बोलावलं नाही. मी कुठल्याही नगरसेवकाच्या दरवाजात गेलो नाही. स्वत:हून ते नगरसेवक आले. आता हायकमांड येतील आणि कोण कुणाला घेऊन गेलं, हे त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल. शेवटी खासदार झाले म्हणजे जिल्ह्याचे लोकसभेचे मालक ठरत नाहीत. इथे कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचही काम आहे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

दरम्यान,  चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे २४ नगरसेवक जिंकून आले आहेत. तर काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. तर जनविकास सेनेचे ३ नगसरेवक मिळून काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांची संख्या ३० एवढी होत आहे. मात्र महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ३४ नगरसेवकांचे बहुमत आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसला अजूनही चार नगरसेवकांची गरज आहे. तर चंद्रपूरमध्ये उद्धवसेनेचे ६ नगरसेवक जिंकून आले असून, त्यामुळे उद्धवसेना किंगमेकर ठरली आहे. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत येथे काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress infighting escalates in Chandrapur, Vadettiwar and Dhanorkar clash.

Web Summary : Chandrapur Congress faces internal conflict as Dhanorkar accuses Vadettiwar of dividing the party after recent election gains. Both leaders trade accusations, impacting coalition efforts and delaying crucial meetings for forming government. Uddhav Sena emerges as kingmaker.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार