शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

माजी शिवसैनिकाचा दे धक्का; ७ नगरसेवक फोडले, १२ जणांचा काँग्रेस प्रवेश रोखताना सेनेच्या नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 5:35 PM

पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या ताब्यातील एकमेव नगर परिषद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता

चंद्रपूर: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना स्थानिक पातळीवर वेगळं राजकारण सुरू आहे. तिन्ही पक्ष एकदिलानं काम करत असल्याचा दावा वरिष्ठ नेते करत असताना स्थानिक पातळीवर नेत्यांकडून चढाओढीचं राजकारण सुरू आहे. चंद्रपूरमध्ये त्याचाच प्रत्यय आला आहे. शिवसेनेचे ७ नगरसेवक काँग्रेसनं फोडले आहेत. वरोरा नगरपरिषदेतल्या ७ नगरसेवकांनी शिवबंधन सोडून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. 

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरात सेनेला धक्का दिला आहे. विशेष म्हणजे धानोरकर याआधी शिवसेनेतच होते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि खासदार झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी वरोरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या. वरोरा आणि भद्रावतीमध्ये धानोरकर यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे भद्रावतीमधील शिवसेनेची सत्ता धोक्यात आली आहे.काँग्रेसकडून टॅलेंट हंट सुरू! दोन तरुण नेते पक्षात प्रवेश करणार?; राहुल गांधींसोबत बैठकांचं सत्र सुरू

वरोरा नगर परिषदेतील शिवसेनेचे ७ नगरसेवक धानोरकर यांनी फोडले. याशिवाय भद्रावती नगर परिषदेतील शिवसेनेच्या १२ नगरसेवकांचा पक्षप्रवेशदेखील आजच संपन्न होणार होता. मात्र शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रशांत कदम भद्रावतीमध्ये तळ ठोकून बसले. नगरसेवकांचा पक्षप्रवेश रोखण्यासाठी त्यांनी जवळपास ४८ तास सूत्रं हलवली. अखेर त्यांना पक्षप्रवेश रोखण्यात यश आलं. 

भद्रावती नगर परिषदेवर स्थापनेपासून शिवसेनेची सत्ताभद्रावती नगर परिषदेची स्थापना १५ ऑगस्ट १९९८ रोजी झाली. तेव्हापासून आजतागायत तब्बल २३ वर्षे महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यात धानोरकरांचा मोठा वाटा होता. त्यामुळे धानोरकर काँग्रेसवासी झाल्यानंतर ते सेनेला खिंडार पाडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. धानोरकर यांच्या नेतृत्त्वाखालीच नगर परिषदेत सेनेची सत्ता आली. त्यामुळे सेनेचे नगरसेवक त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. सध्या तरी सेनेला नगरसेवकांचा पक्षप्रवेश रोखण्यात यश आलं आहे. पूर्व विदर्भातील एकमेव नगर परिषद राखण्याचं आव्हान आता सेनेसमोर आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस