शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 19:24 IST

देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या तर मला ‘चंपा’ संबोधतात ते कसे काय चालते? अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना प्रतिसवाल केला होता.

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आघाडीवर होते. मात्र त्यानंतर पाटील यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मला तसे म्हणायचे नव्हते. मी फक्त कायदेशीर बाबींचा संदर्भ घेऊन बोलत होतो अशी सारवासारव करतानाच अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. तसेच देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या तर मला ‘चंपा’ संबोधतात ते कसे काय चालते? अशा शब्दात टीकाकारांना प्रतिसवाल केला होता. मात्र या प्रश्नाला उत्तर देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. 

पुणे पदवीधर निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ जयंत पाटील हे पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील जिथे जातात तिथे प्रश्नच निर्माण करतात. कारण चंद्रकांत पाटलांसाठी भाजपच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना कोथरूड विधानसभा मतदार संघाचे तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर तिथे पाटील आमदार झाले. त्यामुळे नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी यांना पक्षाकडून पदवीधर निवडणुकीसाठी आपला विचार होईल अशी अपेक्षा होती. मात्र भाजपने पदवीधर निवडणुकीत देखील त्यांना तिकीट नाकारले. त्यांच्याऐवजी संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी पुण्यात येऊन काय प्रश्न निर्माण केले? हे माझ्यापॆक्षा मेधा कुलकर्णीच चांगल्या प्रकारे सांगतील अशा शब्दात जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला. 

आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये, अशा शब्दात जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला. चंद्रकांत पाटलांनी पुणेकरांनी मोठ्या मनाने स्वीकारले. मात्र पदवीधरच्या असो वा पुणे कोथरूड मतदार संघ ते ज्या ज्या वेळी निवडून आले. त्या भागाच्या विकासासाठी त्यांनी किती प्रयत्न केले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेल्या पदवीधर मतदारांचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी आत्तापर्यंत कितपत पुढाकार घेतला आहे. हाही एक प्रश्नच आहे असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा