शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या प्रतिमेवर चंद्रकांतदादांचा पत्रकारांना नमस्कार, राम कदमांचा प्रश्न टाळला      

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 23:43 IST

राम कदमांसह सुधाकर परिचारक यांच्यासारख्या आमदारांमुळे भाजपाची प्रतिमा मलिन होत नाही का, या पत्रकारांच्या प्रश्नावर राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क हात जोडत नमस्कार केला.

सावंतवाडी : राम कदमांसह सुधाकर परिचारक यांच्यासारख्या आमदारांमुळे भाजपाची प्रतिमा मलिन होत नाही का, या पत्रकारांच्या प्रश्नावर राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क हात जोडत नमस्कार केला. कालपर्यंत आमदार कदम यांची बाजू सावरणारे मंत्री पाटील यांनी शनिवारी सावंतवाडीत मात्र चुप्पी साधत उलटा पत्रकारांनाच नमस्कार करत पत्रकार परिषद आटोपती घेतली.चिपळूणपासून झारापपर्यंतच्या रस्त्याची पाहणी करून राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी सावंतवाडीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष महेश सारंग, मनोज नाईक, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.पनवेलपासून झारापपर्यंतच्या रस्त्याची मी पाहणी केली. खड्डे भरण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात कणकवलीपर्यंतच्या रस्त्याची मी पाहणी केली होती. मात्र सावंतवाडीकडचा भाग राहिला होता. त्याची खास पाहणी करण्यासाठी आज आलो आहे.खड्डे भरण्याच्या कामावर मी समाधानी नाही. पण पनवेल ते झाराप हा रस्ता मे २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि तो पूर्ण करणारच, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. गणेश चतुर्थीच्या काळात बांधकाम विभाग खास पेट्रोलिंगसाठी पथक तैनात करणार आहे. हे पेट्रोलिंग प्रत्येक ५० किलोमीटरपर्यंत एक पथक अशी झाराप ते पनवेलपर्यंत ठेवण्यात येतील. ज्या ठिकाणी खड्डा पडेल तो खड्डा भरण्यासाठी या पथकाकडे साधनसामुग्री असेल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. मुंबईहून येणारे चाकरमानी बहुतांशी कोल्हापूरमार्गे आंबोली घाटातून येतात. पण या मार्गाची दुर्दशा झाली आहे. पण चतुर्थीला अद्याप सहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे हळूहळू हे काम पूर्ण करू, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.आगामी निवडणुका शिवसेना-भाजपा एकत्र लढवणार असल्याचे सांगत नक्की आमचा विजय होईल, असा विश्वासही मंत्र्यांनी व्यक्त केला. आमदार राम कदम, प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होतेय, यावर मात्र चंद्रकांत पाटलांनी मौन बाळगणेच पसंत केले. पत्रकरांनाच नमस्कार करत पत्रकार परिषद आटोपती घेतली.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील